सातारा - ओबीसी घटकाला पण निवडणुकीत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची इच्छा आहे. कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार आहे. ज्या संस्थांची मुदत संपली आहे. त्याठिकाणी प्रशासक नेमावेत. आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला असून हा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत निवडणुका नकोत, या भुमिकेचा मुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar on OBC Reservation ) यांनी आज पुनरुच्चार केला.
अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाईंना अभिवादन -
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंचे जन्मगाव नायगाव (ता. खंडाळा) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन (Ajit Pawar greeted Savitribai Phule at Naigaon) केले. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न फक्त महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेशातही निर्माण झाला आहे. ओबीसी घटकाला पण निवडणुकीत प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे, हीच महाविकास आघाडी सरकारची इच्छा आहे. कारण तो त्यांचा हक्क आणि अधिकार. ज्या संस्थांची मुदत संपली आहे. त्याठिकाणी प्रशासक नेमावेत. ओबीसींच्या ज्या जागा असतील त्यावर त्यांना प्रतिनिधीत्व दिले गेले पाहिजे.
'...तर राज्यात कठोर निर्णय'
राज्यात ओमायक्राॅनची संख्या अशीच वाढत राहिली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावे लागतील. पश्चिम बंगालमध्ये संख्या वाढायला लागल्यावर लाॅकडाऊन केला आहे. देशातील काही राज्यांमध्येसुद्धा असे निर्बंध घातले गेले आहेत. त्यामुळे आपल्याकडेसुद्धा कठोर निर्णय घेण्याची वेळ येवु शकते, असा इशारा अजित पवारांनी दिला.
'सरकार पाडण्यासाठी राणेंच्या रुपाने नवीन व्यक्तीची भर'
सरकार पाडण्यासाठी नारायण राणेंच्या रुपाने आता नवीन व्यक्तीची भर पडली असल्याचा टोला अजित पवारांनी नारायण राणेंना लगावला. नारायण राणेंनी 1999 ते 2004 चे सरकार पडण्याचा बराच प्रयत्न केला आणि आता नारायण राणेंच्या रुपाने सरकार पाडण्यासाठी आणखी एका नविन व्यक्तीची भर पडली असल्याची खोचक टीका अजित पवार यांनी केली. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत राणेंचा विजय झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून अजित पवार म्हणाले, निवडणुकीत यश अपयश येतच असते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅक फुटवर जावे लागले. मात्र, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगले यश मिळाले.
हेही वाचा - Narayan Rane Sindhudurg : जिल्हा बँक जिंकली, आता लक्ष महाराष्ट्राच्या सत्तेकडे - नारायण राणे
हेही वाचा - Savitribai Phule Birth Anniversary 2022 : हरी नरके यांनी उलगडला सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट