सातारा - ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या समाधी मंदिरात आज पौर्णिमेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. रविवारच्या सुट्टीला लागूनच आज बुद्धपौर्णिमेची सुट्टी असल्याने नेहमीपेक्षा आज भाविकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली होती. पहाटे काकड आरतीपासून समाधी मंदिरात विविध कार्यक्रम सुरू होते. समाधी दर्शनाबरोबरच श्रींचा अभिषेक व अनुग्रह घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
उन्हाचा कडाका वाढला असला तरी भर उन्हात भाविक मोठ्या गर्दीने दर्शनाच्या बारीने समाधीचे दर्शन घेत होते. भाविकांसाठी दिवसभर प्रसाद व्यवस्था सुरू होती. समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सर्व मंदिर परिसरात शेडनेट उभारण्यात आले आहेत.