ETV Bharat / state

August Kranti Din: साताऱ्याच्या कॉम्रेडने केलेल्या चित्रिकरणामुळे ऑगस्ट क्रांतीच्या आठवणी आजही जिवंत - ऑगस्ट क्रांतीचा इतिहास

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी देशातील अनेक ठिकाणी वेगवेगळी आंदोलने झाली होती. त्यातील एक आंदोलन मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर झाले होते. हे आंदोलन 8 ऑगस्ट 1942 रोजी झाले होते. या आंदोलनाचे चित्रिकरण साताऱ्यातील कम्युनिस्ट कार्यकर्ते आणि हौशी छायाचित्रकार दादू रमजू यांनी केले होते. त्या चित्रिकरणामुळे 80 वर्षानंतरही ऑगस्ट क्रांतीचा इतिहास आपल्या समोर जिवंत उभा राहतो.

ऑगस्ट क्रांतीचा इतिहास (कॉम्रेड दादू रमजू )

author img

By

Published : Aug 9, 2023, 2:19 PM IST

Updated : Aug 9, 2023, 2:56 PM IST

कॉम्रेड विजय मांडके

सातारा: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी काँग्रेस अधिवेशनात ब्रिटिशांविरोधात 'चले जाव', चा नारा दिला. त्यानंतर देशभरात 'भारत छोडो' आंदोलनाला सुरुवात झाली. महात्मा गांधींनी 'चले जाव' चा नारा देताच संपूर्ण देशात 9 ऑगस्टला क्रांतीचा वणवा पेटला. हा दिवस क्रांती दिन म्हणून पाळायचे ठरल्यानंतर हा दिवस स्वातंत्र्याच्या इतिहासातील ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.

चित्रिकरणामुळे इतिहास होतो जिवंत: महात्मा गांधी पुकारलेल्या भारत छोडो आंदोलनाचा ब्रिटिशांनी मोठा धसका घेतला होता. देशभरात आंदोलनाचा वणवा 'चले जाव' या नाऱ्यामुळे पेटला होता. या आंदोलनाचे पडसाद बघता ब्रिटिशांनी स्वांतत्र्य लढ्यातील कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली. आंदोलनातील नेत्यांची धरपकड केली. दरम्यान त्या ऑगस्ट क्रांतीला आज 81वर्षे पूर्ण होत आहेत. ऑगस्ट क्रांतीच्या सर्व प्रसंगाचे सातार्‍यातील कॉम्रेड दादू रमजू यांनी केलेल्या चित्रिकरणामुळे क्रांतीचा इतिहास आजही जिवंत आहे.

ऑगस्ट क्रांतीचा इतिहास
ऑगस्ट क्रांतीचा इतिहास

मूव्ही कॅमेर्‍याने केले चित्रिकरण: मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिशांकडून कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. नेते मंडळींची धरपकड केली गेली. आंदोलनकर्त्यांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. त्या आंदोलनावेळी सातार्‍यातील हौशी छायाचित्रकार आणि कम्युनिस्ट कार्यकर्ता दादू रमजू हे त्यांच्या सहकार्‍यांसह उपस्थित होते. गवालिया टँक मैदानावरील त्या सर्व घटनांची त्यांनी छायाचित्रे काढली. तसेच सहकार्‍यांच्या मदतीने त्यांनी मूव्ही कॅमेर्‍याने सर्व प्रसंगाचे चित्रिकरणदेखील केले. त्यांनी चित्रिकरण केल्यामुळेच ऑगस्ट क्रांतीचा इतिहास चित्रफितीच्या रूपाने आजही जिवंत आहे. हा सर्व इतिहास जिवंत ठेवणारे दादू रमजू मात्र आज हयात नाहीत.

ब्रिटिशांनी कॅमेरा जप्त केला: कॉम्रेड दादू रमजू यांचे धाकटे बंधू आणि सातार्‍यातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार एम.रमजू यांनी यासंदर्भातील महत्वाची आठवण सांगितली. गवालिया टँक मैदानावरील एका झाडाच्या आडून कॉम्रेड दादू रमजू हे चित्रिकरण करत होते. त्यावेळी एका ब्रिटिश सैनिकाने त्यांना पकडून अधिकार्‍यासमोर उभे केले. कॅमेर्‍यातील रोल काढून त्या अधिकार्‍याने दादू रमजू आणि त्यांच्या एका सहकार्‍याकडून कॅमेरा काढून घेतला. कॅमेरा परत मिळवण्यासाठी त्या दोघांनी एका पत्रकाराला मध्यस्थी घालून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याची प्रत्यक्ष भेट घेतली. त्या अधिकाऱ्याकडे कॅमेरा परत देण्याची विनंती दोघांनी केली.

जप्त करण्यापूर्वीच रोल काढला: जप्त केलेला कॅमेरा ब्रिटिश सैनिकांना ऑपरेट करता येत नव्हता. म्हणून कॅमेर्‍यात असलेला रोल काढून अधिकाऱ्याने त्यांच्याबरोबर दोन पोलीस शिपाई पाठवले. तो रोल त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाच्या डार्क रूममध्ये धुतला आणि कॅमेरा पुन्हा कॉम्रेड रमजू यांना दिला. परंतु कारवाईचे जे फोटो काढण्यात आले होते ते फोटो दुसऱ्या एका रोलमध्ये होते. ब्रिटिश अधिकार्‍याने कॅमेरा जप्त करण्यापूर्वी दादू रमजूंनी तो रोल कॅमेर्‍यातून काढून खिशात ठेवला होता. त्या रोलमध्ये व्यवस्थित चित्रीकरण झाले होते. त्या रोलमुळेच ऑगस्ट क्रांतीच्या प्रसंगाचे चित्रिकरण आजही आपल्याला उपलब्ध होत आहे.

ऑगस्ट क्रांतीचे चित्रिकरण: काँम्रेड दादू रमजू यांच्या कॅमेर्‍यातील दुसर्‍या रोलमध्ये जे चित्रिकरण होते. ते त्या ब्रिटिश अधिकार्‍याने इंग्लडमध्ये त्याच्या संग्रही ठेवलेले होते. ते देखील भारत सरकारला उपलब्ध झाले असल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय कॉम्रेड दादू रमजू यांच्याकडील चित्रिकरण त्यांचे छायाचित्रकार बंधू एम.रमजू यांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसमोर आणले. सातार्‍यातील छायाचित्रकार दिवंगत दत्ता भिडे तसेच दिलिप आंबेकर यांच्या मदतीने मुव्ही कॅमेर्‍यातील फोटो आणि फिल्मच्या आधारे स्लाईड शो तयार केला.

स्लाईड शोचे रूपांतर डिव्हिडीत: स्लाईड शोमधील स्लाईड्स खराब होऊ लागल्या. तसेच स्लाईड शो दाखवणे जिकिरीचे झाल्याने ते बंद करावे लागले. म्हणून सातार्‍यातील संगणक तज्ज्ञ व छायाचित्रकार सुधीर सुकाळे व केतन हेंद्रे यांनी त्या स्लाईडसचे व्हिडिओमध्ये रूपांतर केले. त्याची डिव्हिडी कॅसेटदेखील काढली. कॉम्रेड दादू रमजूंचे बंधू छायाचित्रकार एम.रमजू यांनी त्या व्हिडिओच्या दोन वेगवेगळ्या डिव्हिडी काढून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या वाळवा येथील स्मारक भवनात ठेवली. तर दुसरी डिव्हिडी कॅसेट कुंडल येथील क्रांती अग्रणी जी.डी.बापू लाड स्मारकात ठेवल्या आहेत.

हेही वाचा-

  1. स्वातंत्र्यदिन विशेष : बिलासपूरचे 'हे' कुटुंब दररोज का फडकावते तिरंगा?
  2. स्वातंत्र्याची 75 वर्षे : कर्नाटकातील जालियानवाला बाग विदुरश्वतामध्ये काय झाले होते? जाणून घ्या

Last Updated : Aug 9, 2023, 2:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.