कराड (सातारा) - कृष्णा रुग्णालयात दाखल केलेल्या १६ वर्षांच्या तरुणीसह ३७ वर्षाच्या महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधित रुग्णाच्या निकट सहवासात आल्यामुळे या दोन महिलांनाही संसर्ग झाला. शुक्रवारी कराड तालुक्यात कोरोनाचे १० रुग्ण आढळून आले. आता कराडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ वर पोहचली आहे.
कराडमधील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ७१, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ३ सह एकूण ९४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे डॉ. गडीकर यांनी दिली सांगितले. जिल्ह्यातील ४५ रुग्ण उपचार घेत असून आतापर्यंत ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, २ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना बाधितांच्या निकट सहवासातील ९० जणांना कृष्णा रुग्णालयात आणि १२२ जणांना वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.