ETV Bharat / state

सातारा : 13 रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण - सातारा जिल्हा न्यूज अपडेट

कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

author img

By

Published : May 29, 2021, 8:20 PM IST

सातारा - कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करता यावे, यासाठी राज्य शासनाकडून सातारा जिल्ह्यासाठी 13 रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

सातारा जिल्ह्यासाठी राज्य शासनाकडून 13 रुग्णवाहिका मिळालेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार असून, भविष्यात या सुविधेचा चांगला उपयोग होईल. कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देत असल्याचे पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या या लोकार्पण कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांची उपस्थिती होती.

रुग्णवाहिकांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

दूध संकलन केंद्रांबाबत नवा आदेश

दरम्यान, कोरोना ‍विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्ह्यात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी नवीन आदेश काढला आहे. “ दूध संकलन केंद्रे सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहतील. वितरणाबाबत फक्त घरपोच दूध वितरणास परवानगी असेल” असे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा - 'देशातील लस निर्मिती कंपन्यांकडून अपेक्षित लसींचा पुरवठा नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.