सांगली - शिराळा तालुक्यातील कोकरूड येथील एका शिक्षकाने वडिलांच्या उत्तरकार्य विधीवर होणारा खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवला. सुनील घोडे असे या शिक्षकाचे नाव असून ते माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांनी 200 गोरगरीब आणि आर्थिक दुर्बल घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
कोकरूड गावचे रहिवासी सुनील घोडे यांचे वडील ए. के. घोडे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदी आहे. यामुळे प्रशासनाच्या नियमाला अधीन राहून घोडे कुटुंबियांनी रक्षा विसर्जनाचा विधी पार पाडला होता. उत्तरकार्य विधीवर होणारा खर्च त्यांनी गरजू लोकांसाठी वापरण्याचे ठरवले.
कोकरूडमधील घोडे कुटुंबीय हे सामाजिक कार्यासाठी ओळखले जाते. याही वेळी त्यांनी सामाजिक जाणीवेतून गरजूंना मदत केली. यावेळी अनिल पाटील, विजय पाटील, संतोष घोडे, सचिन मोहिते, ए. सी. पाटील, गणेश माने हे उपस्थित होते.