सांगली - कडकनाथ कोंबडी पालन घोटाळाप्रकरणी रयत अॅग्रो इंडिया कंपनीच्या पाच जणांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी कंपनीचे संस्थापक संदीप मोहिते याला अटक केली आहे.
हेही वाचा... कोल्हापूरच्या कडकनाथ घोटाळा प्रकरणी संचालकांवर गुन्हा दाखल
हेही वाचा... 'कडकनाथ' घोटाळा प्रकरण : सांगलीत स्वाभिमानी व प्रहार संघटनेचा आसूड मोर्चा
हेही वाचा... कडकनाथ घोटाळा : जास्त पैसे देण्याचे अमिष दाखवून शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा
सांगलीच्या इस्लामपूर येथील रयत अॅग्रो इंडिया कंपनी कडून दुप्पट-तिप्पट नफ्याच्या आमिषाने कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये सुमारे पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळा झाल्याचे समोर आले होते. यानंतर या कंपनी विरोधात अनेक तक्रारी दाखल होत होत्या. यामुळे घोटाळ्याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये रयत अॅग्रो इंडिया कंपनीच्या संस्थापक असणाऱ्या सुधीर मोहिते आणि संदीप मोहिते यांच्यासह पाच जणांच्या विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले होते. इस्लामपूर पोलिसांनी या प्रकरणी संदीप मोहिते या संस्थापक अध्यक्ष याला अटक केली आहे.
या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर तसेच शेजारच्या कर्नाटक राज्यातही असल्याने या कंपनीच्या विरोधात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा... 'कडकनाथ' स्कीममध्ये सांगलीत मोठा घोळ; ५०० कोटींची फसवणूक
हेही वाचा... पूरग्रस्त भागात मदत करणाऱ्या जवानांना कडकनाथ अंड्यांची मदत