सांगली - इस्लामपूर येथील महाविद्यालय तरुणावर अनैसर्गिक अत्याचार प्रकरणी पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली आहे. पीडित तरुणाकडे तिच्या मैत्रिणीसोबत शारीरिक संबंधास नकार दिल्याने देवकर याने पीडित तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करत खंडणी घेतल्याचा प्रकार घडला होता.
पोलीसाकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार -
सांगली जिल्ह्यात खळबळ उडवणारी आणि पोलीस दलाला काळीमा फासणारी घटना इस्लामपूर या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली आहे. इस्लामपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी असणाऱ्या हणमंत देवकर याने एका महाविद्यालयीन तरुणावर अनैसर्गिक अत्याचार करत चार हजार रुपयांची खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय तरुणाच्या अत्याचाराचा व्हिडिओ करून तो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मैत्रिणी सोबत संबंधास नकार दिल्याने अत्याचार -
इस्लामपूर या ठिकाणी 27 ऑक्टोबर पहाटेच्यावेळी गस्त घालत असताना देवकरला पीडित तरुण आढळून आला होता. त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो तिच्या मैत्रिणीच्या घरून आल्याचा सांगितलं होते. त्यानंतर देवकरने 29 ऑक्टोंबर रोजी तरुणाला गाठून त्याच्याकडे तिच्या मैत्रिणी सोबत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र, त्या तरुणाने नकार दिल्यानंतर देवकर याने संबंधित तरुणावर त्याच्या रुमवर नेऊन अनैसर्गिक अत्याचार करत अत्याचाराचा व्हिडिओ देखील केला होता. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 4 हजारांची खंडणी उकळली होती.
पोलीस सेवेतून केले निलंबित -
या घटनेनंतर 21 नोव्हेंबर रोजी देवकर हा पुन्हा तरुणाकडे अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या दृष्टीने आला होता. मात्र, पीडित तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत संबंधित घटनेबाबत तक्रार दाखल केली होती. त्यांनतर इस्लामपूर पोलिसांनी हणमंत देवकर याला अटक केली होती. देवकर याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, इस्लामपूर पोलिसांकडून देवकर यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्ताव पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवला होता. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पोलीस कर्मचारी हणमंत देवकर याला निलंबित केले आहे.
हेही वाचा - SSC-HSC EXAM : दहावी-बारावीच्या परीक्षा यावर्षी ऑफलाईनच?, शिक्षण विभागाच्या बैठकीत एकमत