ETV Bharat / state

सांगलीतील ज्येष्ठ नेते वनश्री नानासाहेब महाडिक यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन - सांगली

वाळवा तालुक्यातील ताकदवान नेते म्हणून नानासाहेब महाडिक यांची जिल्हाभर ओळख होती. त्यांचे दोन्ही मुले स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नेतृत्व करत आहेत.

नानासाहेब महाडिक
author img

By

Published : May 11, 2019, 7:10 PM IST

सांगली - नानासाहेब महाडिक यांचे आज (शनिवारी) दुपारी वयाच्या ६२ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. वाळवा तालुक्यात राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात महाडिक यांची भरीव कामगिरी राहिली आहे.माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून त्यांची ओळख होती.

जेष्ठ नेते, उद्योगपती, वनश्री नानासाहेब महाडिक ६२ वर्षाचे होते. वाळवा तालुक्यातील ताकदवान नेते म्हणून नानासाहेब महाडिक यांची जिल्हाभर ओळख होती. त्यांचे दोन्ही मुले स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नेतृत्व करत आहेत. वाळवा तालुका आणि पेठ परिसरात राजकीय, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात महाडिक यांची मोलाची कामगिरी राहिली आहे. सध्या इस्लामपूर नगरपालिका आणि सांगली जिल्हा परिषदेत भाजपच्या सत्तेत महाडिक गटाचा पाठिंबा आहे. तर, महाडिक यांची मुलगी रोहिनी पाटील सांगली महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका आहेत.

नानासाहेब महाडिक यांनी वाळवा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडिक यांचे ते काका व माजी आमदार महादेव महाडिक यांचे ते चुलत बंधू होते.नानासाहेब महाडिक यांच्या निधनामुळे वाळवा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली

फोटो

File name - R_MH_1_SNG_11_MAY_2019_NANA_MAHADIK_DEATH_SARFARAJ_SANADI

स्लग - जेष्ठ नेते वनश्री नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन ..

अँकर - इस्लामपुरचे जेष्ठ नेते वनश्री नासाहेब महाडिक यांचे आज वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.वाळवा तालुक्यात राजकीय, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात महाडिक यांचे भरीव कामगिरी राहिले आहे.माजी मंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून त्यांची ओळख होतीBody:सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे जेष्ठ नेते,उद्योगपती,वनश्री नानासाहेब महाडिक यांचे आज दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे.ते 62 वर्षाचे होते,त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी जावई, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.वाळवा तालुक्यातील ताकदवान नेते म्हणून नानासाहेब महाडिक यांची जिल्हाभर ओळख होती.त्यांचे दोन्ही मुले स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे नेतृत्व करत आहेत.
वाळवा तालुका आणि पेठ परिसरात राजकीय,सहकार,शैक्षणिक क्षेत्रात महाडिक यांची मोलाची कामगिरी राहिली आहे.सध्या इस्लामपूर नगरपालिका आणि सांगली जिल्हा परिषदेत भाजपा सत्तेत महाडिक गटाचा पाठिंबा आहे.तर महाडिक यांची मुलगी सौ.रोहिनी पाटील या सांगली महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका आहेत.नानासाहेब महाडिक यांनी वाळवा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडणूक लढवली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे ते कट्टर विरोधक म्हणून ओळखले जायचे.
तर कोल्हापूरचे खासदार मुन्ना महाडीक यांचे ते काका व माजी आमदार महादेव महाडिक यांचे ते चुलत बंधू होते.नानासाहेब महाडिक यांच्या निधनामुळे वाळवा तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.