ETV Bharat / state

मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख - latest corona sangali

मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

मिरज
मिरज
author img

By

Published : Mar 29, 2020, 9:22 PM IST

सांगली - जिल्ह्यातील इस्लामपूर येथे 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत आणि हे सर्व रुग्ण मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येची गांभीर्याने दखल घेऊन मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रूपांतर करण्यात आल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.

इस्लामपूर येथे अचानकपणे वाढलेल्या करोना रुग्णांची संख्या लक्षात येताच मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीने त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती शुक्रवारी सांगलीत दाखल झाली. त्यांनतर डॉ. सापळे यांनी तातडीने मिरज येथे भेट देऊन येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाचे तातडीने 300 खाटांच्या कोरोना रुग्णालयात रूपांतर केले आहे.

यात पंधरा आय. सी. यू. बेड, सिटी स्कॅन एम. आर. आय. या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोरोना तपासणीसाठी येत्या, तीन ते चार दिवसात तपासणी केंद्राची निर्मिती करण्यात येणार आहे आणि कोरोनाची वाढती संख्या पाहता मिरज शासकीय रुग्णालयाचे रूपांतर हे कोरोना रुग्णालयात करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली.

तसेच मिरज येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील सर्व निवासी डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, वाहन चालक व अन्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.