ETV Bharat / state

leopard: मांजरा मागून घरात बिबट्या शिरला; जेवत बसलेल्या कुटुंबाची उडाली भंबेरी - वनविभाग

leopard: मांजराचा पाठलाग करत थेट बिबट्या घरात घुसला leopard entered the house आणि सगळ्यांचीच भंबेरी उडाली. leopard वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अखेर काही वेळानंतर बिबट्याला सुखरूप वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

leopard
leopard
author img

By

Published : Oct 12, 2022, 10:19 PM IST

सांगली: मांजराचा पाठलाग करत थेट बिबट्या घरात घुसला leopard entered the house आणि सगळ्यांचीच भंबेरी उडाली. leopard वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अखेर काही वेळानंतर बिबट्याला सुखरूप वनविभागाकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली होती.

असा घडला प्रकार मरळनाथपूर गावातील पश्चिमेस डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या वस्तीमध्ये बाळासाहेब हजारे यांचे घर आहे. हजारे कुटुंबीय घरामध्ये रात्रीच्या सुमारास जेवत बसले होते. यावेळी अचानकपणे घरात मांजर पळत आले, आणि त्याच्या मागोमाग बिबट्या दाखल झाला. बिबट्याला अचानकपणे समोर पाहून हजारे कुटुंबीयांची सगळ्यांचीच भंबेरी उडाली. क्षणातच बाळासाहेब हजारे यांनी आपल्या कुटुंबाला घरातून बाहेर काढलं. आणि धाडस करून घराला बाहेरून कडी लावली. आणि याची माहिती गावातल्या लोकांसह वनविभागाला Forest Department दिली.

सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला त्यानंतर हजारे यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने गर्दी झाली. वन विभागाचे कर्मचारी व प्राणीमित्र तातडीने दाखल झाले होते. त्यानंतर घरामध्ये दाखल झालेला हा बिबट्या लहान असून तो कमी वयाचा असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या परिसरामध्ये या बिबट्याची आई- मादी बिबट्या असणार ही बाब गृहीत धरून तातडीने वनविभागाकडून घराच्या दरवाजा अलगदपणे उघडून बिबट्याला मार्ग मोकळा करून देत निसर्गाच्या अधिवासात हुसकावून दिले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, तर घरामध्ये घुसलेल्या या बिबट्याच्या घटनेमुळे गावात भीती वातावरण निर्माण झालं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.