ETV Bharat / state

अवघ्या आठ दिवसातच कोरोनामुळे दोन सख्ख्या भावांचा मृत्यू; खानापूर तालुक्यातील घटना

author img

By

Published : May 31, 2021, 6:10 PM IST

अवघ्या आठ दिवसातच दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील आळसंद येथे घडली आहे.

two brothers death due to corona
कोरोनाने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

सांगली - अवघ्या आठ दिवसातच दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खानापूर तालुक्यातील आळसंद येथील नरुले कुटुंबातील कर्त्या पुरुषांचं निघून जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भावांच्या मृत्यूच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाने होतायेत कुटुंब उद्ध्वस्त

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या- कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. सांगली जिल्ह्यातही गेल्या महिन्याभरात अनेक कुटुंब कोरोनाच्या तडाख्याने मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अशीच आणखी एक घटना खानापूर तालुक्यातल्या आळसंद येथे घडली आहे. गावातील नरुले कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा अवघ्या आठ दिवसाच्या अंतरात कोरोनाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

हेही वाचा - 'मोदींचे शून्य लस धोरण भारत मातेच्या छातीत खंजीर खुपसतंय'; राहुल गांधींचे टिकास्त्र

आठ दिवसात सख्खया भावांचा मृत्यू

विद्याधर कृष्णाजी नरुले (वय 50) व सुधाकर कृष्णाजी नरुले (वय 48) अशी या सख्ख्या भावांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वीच आळसंद येथील नरुले कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये आई, दोन मुले व नात अशा चौघांचा समावेश होता. यातून त्यांच्या आई व नात कोरोनामुक्त झाल्या, परंतू त्यांची दोन मुले विद्याधर व सुधाकर यांची प्रकृती खालावत गेली. यातून 19 मे रोजी इस्लामपूर येथील रुग्णालयात विद्याधर नरुले यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, याच रुग्णालयात उपचार सुरू असलेले विद्याधर यांचे बंधू सुधाकर नरुले यांच्यावरही उपचार सुरू होता. 27 मे रोजी सुधाकर नरुले यांचाही मृत्यू झाला. अवघ्या आठ दिवसांच्या अंतरात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे.

नरुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर

नरुले कुटुंबात रत्नकुमार, विद्याधर व सुधाकर अशी तीन भावंडं. यामध्ये मोठे बंधू रत्नकुमार हे शिक्षक तर विद्याधर हे शेती करत होते. तसेच सुधाकर नरुले हे प्रशासकीय सेवेत होते. त्यांनी महसुलच्या विविध विभागात काम केले होते. गेल्या वर्षभरापूर्वीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. कुटुंबात विद्याधर आणि सुधाकर हे कर्तेधर्ते पुरुष होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर सख्ख्या भावांच्या मृत्यूच्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा - लग्नानंतर ५ महिन्यातच २४ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या, वडिलांना चिठ्ठी लिहून दिले 'हे' कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.