ETV Bharat / state

कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन, पाणी पातळी वाढल्याने मगरी पात्राबाहेर.. - Life Helpline team

कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातील मगरी बाहेर पडू लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमध्ये या मगरींनी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. अशाच दोन मगरींचे दर्शन हरिपूरच्या कृष्णाकाठी झाले आहे.

नदीकाठी विसावताना अजस्त्र मगरी
author img

By

Published : Jul 13, 2019, 12:05 PM IST

Updated : Jul 13, 2019, 3:41 PM IST

सांगली - कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाले आहे. नदीत उडी घेतलेल्या एका मुलीचा शोध घेणाऱ्या बचाव पथकाला या मगरी दिसून आल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मगरीचे दृष्य

कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पात्रातील मगरी बाहेर पडू लागल्या आहेत. नदीकाठच्या शेतांमध्ये या मगरींनी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे. अशाच दोन मगरींचे दर्शन हरिपूरच्या कृष्णाकाठी झाले आहे. एका शेतामध्ये दोन अजस्त्र मगरी दिसून आल्या आहेत. कृष्णा नदीत एका मुलीने उडी घेतल्याचा प्रकार घडला होता. त्या मुलीच्या शोधासाठी आयुष्य हेल्पलाईन टीमकडून नदीपात्रामध्ये शोधमोहीम राबविली जात होती. या शोधमोहिमे दरम्यान बचाव पथकाला या मगरी निदर्शनास आल्या. तब्बल १२ ते १५ फुटांच्या मगरी दिसताच बचाव पथकाने शोध मोहीम थांबविली. याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. नंतर वन विभागाने कृष्णाकाठच्या हरिपूर ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा देत नदीकाठी न जाण्याचा सल्ला दिला. आता या मगरींमुळे हरिपूर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही वर्षांपासून कृष्णेच्या नदीपात्रामधील मगरींच्या हल्ल्यांमुळे दहा जणांचा बळी गेला आहे, तर बारा जण जखमी झाले आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून मगरींचे हल्ले रोखण्यासाठी कृष्णा आणि वारणा काठावरील मगरींचा वावर आणि वास्तव्य असणारी १७ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. यामध्ये औदुंबर, सुखवाडी, अंकलखोप, धनगाव, आमणापूर, तुंग, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, ब्रम्हनाळ, चोपडेवाडी, सांगलीवाडी, सांगलीचा माईघाट, हरिपूर, मिरज कृष्णाघाट, आणि म्हैसाळ या गावातील ठिकाणांचा समावेश आहे.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

Av

Feed send file name - mh_sng_01_magar_img_1_7203751 - to -
mh_sng_01_magar_img_4_7203751

स्लग - कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन,पाणी पातळी वाढल्याने मगरी पात्राबाहेर..

अँकर - सांगलीच्या कृष्णाकाठी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झालं आहे. हरीपुरच्या कृष्णा नदीच्या तीरावर भल्या मोठ्या मगरी दिसून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.नदीच्या वाढलेल्या पाणी पातळीमुळे मगरी या काठावर विसावत आहेत..Body:व्ही वो - सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदी पत्रातल्या मगरी बाहेर पडू लागल्या आहेत.नदीकाठच्या शेतांमध्ये या मगरींनी आश्रय घ्यायला सुरुवात केली आहे.त्यामुळे या मगरींचे दर्शन कृष्णाकाठी होऊ लागले आहे.अश्याचा दोन मगरींचे दर्शन हरिपूरच्या कृष्णाकाठी झाले आहे. एका शेता मध्ये दोन अजस्त्र मगरी दिसून आल्या आहेत.कृष्णा नदीत एक मुलीने उडी घेतल्याचा प्रकार घडला होता, आणि त्या मुलीच्या शोधासाठी आयुष्य हेल्पलाईन टीम कडून नदीपात्रामध्ये शोध मोहीम राबविण्यात येत आहे.आणि या शोध मोहिम,दरम्यान हरिपूर गावानजीक कृष्णाकाठावर दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झालं आहे.तब्बल १२ ते १५ फूट लांबीच्या असणाऱ्या या मगरी निदर्शनास
आल्यानंतर रेस्क्यू टीमने शोध मोहीम थांबवत,याबाबतची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली.नंतर वन विभागाने कृष्णाकाठीच्या हरिपूर ग्रामस्थांना नदीकाठी जाऊ नये,खबरदारी घ्यावी असा सतर्कतेचा इशारा दिला आहे.तर मगरींच्या या दर्शनामुळे हरिपूर ग्रामस्थांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.गेल्या काही वर्षांपासून कृष्णेच्या नदीपात्रामध्ये मगरींच्या हल्ल्यामुळे दहा जणांचे बळी तर बारा जण जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.तर वारंवार घडणाऱ्या या घटनांच्यामुळे अनेक वेळा ग्रामस्थांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून
मगरींचे हल्ले रोखण्यासाठी कृष्णा आणि वारणा काठावरील मगरींचा वावर आणि वास्तव्य असणारे १७ ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहेत.यामध्ये औदुंबर,
सुखवाडी,अंकलखोप,धनगाव,आमणापूर
तुंग,मौजे डिग्रज, कसबे डिग्रज,ब्रम्हनाळ, चोपडेवाडी,सांगलीवाडी,सांगलीचा माईघाट, हरिपूर,मिरज कृष्णाघाट, आणि म्हैसाळ या गावातील ठिकाणांचा समावेश आहे.

Conclusion:
Last Updated : Jul 13, 2019, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.