सांगली - शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात जोरदार पावसाची नोंद झाली आहे. 185 मिलिमीटर पावसाची नोंद चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून चांदोली धरण 81.72 टक्के भरले आहे. तर 34.40 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या या धरणात 28.12 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
धरणातून सध्या 1 हजार 115 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत करण्यात येत आहे. मात्र धरण क्षेत्रात येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणातून दुपारी तीननंतर 2 ते 4 हजार क्युसेक्स पाणी वारणा नदीत सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा -रत्नागिरी, कोल्हापूर पाण्याखाली : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल; NDRF पथक रवाना