ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर,नदी- नाल्यांना पूर - सांगली पाऊस बातमी

सांगली शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. यामुळे सांगलीतील तालुक्यातील अनेक नद्या, नाल्यांना पूर आला आहे. विटा-कराड रस्त्याची वाहतूक शिवणीमार्गे वळविण्यात आली आहे.

पावसाचे पाणी
पावसाचे पाणी
author img

By

Published : Oct 11, 2020, 9:13 PM IST

Updated : Oct 11, 2020, 10:35 PM IST

सांगली - जिल्ह्यामध्ये रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) पावसाचा कहर पहायला मिळाला आहे. सांगली शहरासह दुष्काळी खानापूर, तासगाव आणि कडेगाव या तालुक्‍यांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. तर खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे.तसेच इतर तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे.

सांगली जिल्ह्यातील दृश्ये
सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. रविवारी (दि. 11 ऑक्टोबर) जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडला आहे. दुपारपासून सांगली शहरासह जिल्ह्यातील तासगाव, कडेगाव आणि खानापूर या दुष्काळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तर इतर तालुक्यातही जोरदार पाऊस पडला आहे. खानापूर घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे त्याठिकाणी असणार्‍या नदी-नाले आणि अग्रणी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याचबरोबर या झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यावर आणि पुलावर पाणी आले. तर खानापूर तालुक्यात अग्रणी नदीला पूर आला असून झरे, बलवडी, बेनापूर पुलावर पाणी आले आहे. तर अन्य ओढ्यांसुद्धा पूर आला आहे. तसेच विटा-कराडरोड वरील नांदणी व येरळा नदीवरील कच्चे पूल नदीला आलेल्या पुराने वाहून गेले आहे. त्यामुळे विटा-कराड रस्त्याची वाहतूक शिवणीमार्गे वळविण्यात आली आहे. या शिवाय जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील नदी, नाले आणि ओढ्यांनाही पूर आला आहे. त्यामुळे या ठिकाणी असणारे छोटे बंधारे आणि छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत.

हेही वाचा - सांगलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, चालत्या वाहनांवर कोसळली झाडे

Last Updated : Oct 11, 2020, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.