सांगली - पूरग्रस्तांना घरपोच मदत देण्यासाठी सरकार कटिबद्ध - असल्याचे वक्तव्य उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केले. पूरग्रस्तांना शासनाची सर्वोतपरी मदत मिळणार असून, ती घरपोच करण्याचा कायदाच आहे. त्यामुळे पूरग्रस्तांनी काळजी करू नये, असेही गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.
सांगलीतील पूर स्थितीची आज नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली. सांगलीवाडीतील विविध भागात जाऊन नीलम गोरे यांनी पूरग्रस्तांची संवाद साधला. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा यावेळी नीलम गोऱ्हे यांनी पूरग्रस्तांकडून आढावा घेतला.
शासनाकडून पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत
शासनाकडून पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येत असल्याचेही गोऱ्हे म्हणाल्या. काही ठिकाणी अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, त्या दूर करून प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचणार आहे. ती मदत पोहोचण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील राहील, प्रत्येक शिवसैनिक या पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे. सरकारही पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास नीलम ताई गोऱ्हे यांनी व्यक्त केला.