ETV Bharat / state

GST on turmeric canceled : हळद उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, हळदीवरील जीएसटी अखेर रद्द

अखेर हळद करमुक्त झाली आहे. जीएसटी ( GST on turmeric news ) कौन्सिलकडून हळद शेतीमाल असल्याचे मान्य करत हळदीवर लावलेला 5 टक्के जीएसटी रद्द ( GST on turmeric canceled ) केला आहे. त्यामुळे, व्यापारी आणि शेतकरी ( GST on turmeric news Sangli ) वर्गात आंनद पसरला आहे. करमुक्त हळद निर्णयाचे सांगलीतल्या हळद व्यापाऱ्यांनी स्वागत करत आनंद साजरा केला आहे.

GST on turmeric canceled
जीएसटी हळद सांगली बातमी
author img

By

Published : Jun 4, 2022, 2:18 PM IST

सांगली - अखेर हळद करमुक्त झाली आहे. जीएसटी ( GST on turmeric news ) कौन्सिलकडून हळद शेतीमाल असल्याचे मान्य करत हळदीवर लावलेला 5 टक्के जीएसटी रद्द ( GST on turmeric canceled ) केला आहे. त्यामुळे, व्यापारी आणि शेतकरी ( GST on turmeric news Sangli ) वर्गात आंनद पसरला आहे. करमुक्त हळद निर्णयाचे सांगलीतल्या हळद व्यापाऱ्यांनी स्वागत करत आनंद साजरा केला आहे. तर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. तसेच, सांगलीच्या बाजारपेठेत हळद विक्री व्यवसायात आणखी वाढ होणार असल्याचा विश्वास हळद व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती देताना सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व हळद व्यापारी शरद शहा

हेही वाचा - Gopichand Padalkar on Ahilyanagar : 'अहमदनगर' जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर'करा, गोपीचंद पडळकर यांची मुख्यमंत्र्यांना मागणी

हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगलीची ओळख आहे. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीचे सौदे पार पडतात. साधारण वर्षाला हजार कोटींहून अधिक हळदीची उलाढाल बाजारपेठेत होते. येथील राजापूर हळद ही प्रसिद्ध आहे. देशात नव्हे तर जगातील हळदीचे दर सांगलीच्या बाजार पेठेतील सौद्यावरून ठरतात. येथील हळद उच्चप्रतिची आणि गुणवत्तापूर्ण असल्याने त्याला जागतिक मोठी मागणी आहे. मात्र 2017 पासून हळद उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांना जीएसटी करामुळे हळद विक्रीमध्ये मोठी अडचण आणि भुर्दंड सोसावा लागत होता. हळद हा शेतीमाल असताना त्यावर लावण्यात आलेला 5 टक्के जीएसटी कर अन्यायकारक असल्याची भावना अनेक वेळा शेतकरी व व्यापाऱ्यांनी व्यक्त करत जीएसटी रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलनेही केली होती.

हळदीवरील जीएसटी रद्द करावे, या मागणीसाठी सांगलीतील हळद व्यापारी एन.बी.पाटील पेढीने जीएसटी कौन्सिलकडे अपील केले होती. यावर केंद्रीय कर निर्धारक सदस्य अशोककुमार मेहता आणि राज्य कर निर्धारक सदस्य राजीव कुमार मित्तल यांच्या समोर जीएसटी कर आकारणी बाबत सुनावणी झाली. ज्यामध्ये लवादाने हळद हा शेतीमाल असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे, हळदीवरील लावण्यात आलेला पाच टक्के जीएसटी कर रद्द केला आहे. पण, हळदीवर पुढील प्रक्रियेवर जीएसटी लागू राहणार, असे स्पष्ट केले आहे. हळदीवरील जीएसटी रद्द करण्याच्या निर्णयाचे व्यापारी आणि शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात आले आहे. सांगली मार्केट यार्डातील व्यापारी संघटना असणाऱ्या सांगली चेंबर ऑफ कॉमर्सकडून आतिषबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हळदीची बाजारपेठ पुन्हा बहरणार - याबाबत, सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष व हळद व्यापारी शरद शहा म्हणाले, एक ऐतिहासिक घटना आहे, केंद्रीय जीएसटी कौन्सिलकडून अर्धा शेतीमाल असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते, मात्र आता महाराष्ट्र राज्य सरकार जीएसटी कौन्सिलकडून हळद शेतीमाल असल्याचे मांडण्यात आले आणि केंद्रीय कर निर्धारक व राज्य कर निर्धारक समितीकडून ते मान्य करत हळदीवरील जीएसटी रद्द करण्यात आलेला आहे. त्यामुळे, आता अडत व्यापारी, शेतकरी यांना याचा फायदा होणार आहे. तसेच, सांगलीतून हळदीच्या निर्यातीचा व्यवसाय स्थलांतरित झाला होता, तो आता पुन्हा बाजारपेठेतून सुरू होईल आणि जगात प्रसिद्ध असणाऱ्या सांगलीच्या बाजारपेठेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला आहे.

..म्हणून सांगली हळदीची बाजार पेठ - कृष्णाकाठी मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. राजापुरी हळद जगात प्रसिद्ध आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या तीन जिल्ह्यांत राजापुरी हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सांगलीच्या कृष्णाकाठी हरिपूर या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने पेवच्या माध्यमातून मातीतून हळद पिकवली जायची. त्यामुळे, येथील हळदीला उत्तम प्रतीचा रंग आणि सुगंध प्राप्त होत असे, त्यामुळे निखिल हळदीला मोठी मागणी असायची आणि यातूनच समीरची हळदीची व्यापार पेठ निर्माण झाली होती.

हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नितेश राणे यांची जीभ घसरली, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.