ETV Bharat / state

सांगलीमध्ये कृष्णा नदी पात्रात पाच वर्षाची चिमुरडी गेली वाहून - सांगली पोलीस शोधकार्य

सांगली जिल्ह्यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून जिनेशा भवरलाल पोरवाल ही ५ वर्षाची चिमुरडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

Giral death
जिनेशा भवरलाल पोरवाल
author img

By

Published : Jun 25, 2020, 7:49 AM IST

सांगली - जिल्ह्यातील बहे (ता.वाळवा) येथील रामलिंग बेट परिसरात कृष्णा नदीच्या पात्रात पडून येथील जिनेशा भवरलाल पोरवाल ही ५ वर्षाची चिमुरडी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ही घटना बुधवार (२४ जून) दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली. जिनेशा ही आपली आई व इतर महिलांसमवेत बुधवारी बहे रामलिंग बेटावर फिरण्यासाठी गेली होती. यावेळी ही घटना घडली.

फिरत असताना, दुपारच्यावेळी ती नदीपात्राच्या तीरावरील एका खडकावर खेळत बसली होती. त्यावेळी तिचा पाय घसरल्याने ती नदीच्या पात्रात पडली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ती प्रवाहासंगे वाहून गेली. यावेळी तिच्या आईने व महिलांनी आरडाओरडा केला. परंतु त्यावेळी त्या परिसरात कोणी पुरुष नसल्याने तिच्या मदतीला कोणी धावू शकले नाही.

घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून नागरीकांच्या मदतीने तिचा शोध सुरू केला. मात्र तिचा शोध लागला नव्हता. खरातवाडीजवळ तिची बॅग सापडली आहे. जिनेशा ही शालीमार कापड दुकानाचे मालक भवरलाल पोरवाल यांची कन्या आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.