ETV Bharat / state

...अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करू, मंत्री जयंत पाटलांचा सांगलीकरांना इशारा - sangli lockdown news

सांगली जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.

sangli
जयंत पाटील
author img

By

Published : Jul 14, 2020, 1:42 AM IST

सांगली - कोरोनाचे नियम पाळा अन्यथा पुन्हा जिल्हा लॉकडाऊन करू,असा इशारा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर जनतेला दिला आहे. सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी आढावा बैठक घेत हा इशारा दिला. तसेच नियम पाळण्याचे आवाहनही केले आहे.

सांगली जिल्ह्यात झपाट्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीस सहकार व कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी प्रशासनाने मिरज सिव्हिल हॉस्पीटल येथे सद्या असणाऱ्या आयसीयु बेडची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच नागरिकांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होत नसल्याची बाब मांडली.

याबाबत बोलताना मंत्री पाटील यांनी सांगली जिल्ह्यातीत कोरोना संख्या ६८१ झाले असून, ही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत, मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा, अनावश्यक गर्दी टाळावी, अन्यथा सांगली जिल्हा लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीकर जनतेला दिला आहे.

त्याचबरोबर ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्याठिकाणी कंटेनमेंट झोन आराखड्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच ज्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत, त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे सक्त आदेश पोलीस यंत्रणेला दिले. यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी बोलताना, पुणे, मुंबईहून सांगली जिल्ह्यात आपल्या मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी ये-जा करणे बंद झाले पाहिजे, असे आवाहन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.