ETV Bharat / state

Sangali Crime : मुख्याध्यापक पदासाठी शाळेत महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग; दोन शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल

सांगलीत महिला मुख्याध्यापक त्यांच्याकडील पदाचा कार्यभार आपल्याकडे का देत नाहीत या कारणावरून त्यांचा विनयभंग करण्यात आला आहे. शाळेतील कामकाज सुरू असताना मुख्याध्यापिकेच्या कॅबिनमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sangali Crime
मुख्याध्यापक पदासाठी शाळेत महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग
author img

By

Published : Jan 28, 2023, 8:58 AM IST

Updated : Jan 28, 2023, 10:32 AM IST

सांगली : सांगलीत दोन शिक्षकांनी महिला मुख्याध्यापिकेचा विनयभंग केल्याची धक्कादयक घटना समोर आली आहे. खोजानवाडी येथे ही घटना घडली. शाळेतील मुख्याध्यापकाचा पदभार का देत नाही म्हणून विनयभंग करण्यात आल्याची माहिती आहे. त्याप्रकरणी दोघा शिक्षकांवर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता खोजानवाडी जत तालूका येथे घडली.

मुख्याध्यापक पदाचा कार्यभार : पिडित महिला मुख्याध्यापिका ही जिल्हा परीषदेत गेली 25 वर्षे शिक्षक म्हणून कर्यरत होत्या. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परीषद प्राथमिक मराठी शाळा, खोजनवाडी येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत. सध्या त्यांच्याकडे तीन वर्षापासून मुख्याध्यापक पदाचा कार्यभार आहे. पूर्वीचे मुख्याध्यापक जयश्री हेडगे यांची बदली झाल्याने त्यांच्याकडे प्रभारी मुख्याध्यापक पदाचा चार्ज आहे.

झेंडा वंदन कार्यक्रमानंतरची घटना : सध्या शाळेत बाळू तुकाराम साळुंखे, अर्जुन महादेव माळी, उमेश कोळी, दिनेश चव्हाण असे शिक्षक काम पाहत आहेत. दि.24 जानेवारी रोजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांच्याकडे पत्राद्वारे बाळू तुकाराम साळुंखे यांनी महिला मुख्याध्यापिकेकडे असलेला मुख्याध्यापक पदाचा चार्ज आपल्याकडे तात्काळ हस्तांतरित करावा असे पत्र लिहिले होते. 26 जानेवारी रोजी सकाळी 08.15वाजताच्या सुमारास शाळेतील झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपवून 09.15वा पिडित महिला मुख्याध्यापिका कार्यालयात एकट्याच बसल्या होत्या. त्यावेळी बाळू साळुंखे व अर्जुन माळी त्यांच्याजवळ आले. त्यातील बाळू साळुंखे यांनी मला तुम्ही मुख्याध्यापक पदाचा चार्ज का देत नाहीत असे म्हटले.

शिवीगाळ करत दमदाटी : मला मुख्याध्यापकाचा चार्ज देण्याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती जत यांच्याकडून पत्र आले आहे. तरी सुध्दा तुम्ही मला शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा चार्ज का देत नाही, असे म्हणून बाळू साळुंखे यांनी पिडित महिला मुख्याध्यापिकेला मारहाण केली. त्यानंतर अर्जुन महादेव माळी यांनी ही शिवीगाळ करत दमदाटी केली. त्यावेळी मुख्याध्यापिकेने आरडाओरडा केला असता लोक जमा झाले. असे पिडित मुख्याध्यापिकेने फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात बाळू तुकाराम साळुंखे व अर्जुन महादेव माळी यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लवटे करीत आहेत.

हेही वाचा : Pune Crime: लहान बहिणीशी अश्लील चाळे करणाऱ्या विवाहित बहिणीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Last Updated : Jan 28, 2023, 10:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.