वाळवा (सांगली) - कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर या गावात मधविक्री, जांभळे, करवंदे, जळणविक्री करणाऱ्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या निमित्ताने तालुक्यातील वशी येथील जनक्रांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हे वाटप करण्यात आले.
सध्या लॉकडाऊनमुळे गावोगावी फिरून विक्री करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना काम बंद असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. यामध्ये कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर गावातील राघू वाडा, पेगू वाडा, विठ्ठलाई वाडा, अंबाई वाडा, तळीचा वाडा, या गावातील आणि वाडीवस्तीवरील लोकांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे मध गोळा करून विकणे, करवंदे, जांभळे विकणे हा आहे. तसेच रस्त्यावर काम करून ते लोक आपला उदरनिर्वाह करत असतात. मात्र, या कोरोनाच्या वैश्विक संकटांमध्ये त्यांना यामधील कोणतेही उदरनिर्वाहाचे काम करता आले नाही. त्यामुळे त्यांना मदतीची खूप आवश्यकता होती.
शित्तूर गावातील पत्रकार बजरंग महाराज, शिक्षक सुधीर बंडगर यांनी 'जनक्रांती'ला या परिस्थितीची माहिती दिली. यानंतर जनक्रांतीच्या महिला कार्यकर्त्या शुभांगी गावडे, किशोरी गुरव, दीपा बिरणवार, जयश्री हाबगुंडे, रेखा माणिक लोटे, लता गायकवाड यांनी लोकसहभागातून जीवनावश्यक वस्तूंची व्यवस्था केली. तसेच जीवनावश्यक 18 वस्तू आणि साडी अशी 70 हजार किमतीचे 60 किट बनवले आणि मदत म्हणून वस्तीवरील गोरगरीब गरजू लोकांना वाटप केले. यात अजित गुरुजी, नंदकुमार कांबळे, तात्यासाहेब गडदे, वैशाली खटके, हनुमंत कुंभार, अंजना कोळेकर, किरण शिंदे, दीपक कोळी, माधव गडदे, चंद्रशेखर नरोटे, सुनिल खोत, रूपाली वंजारी, अशोक पाटील आदींचा सहभाग होता.
लॉकडाऊन महाराष्ट्र : शाहूवाडीत गरजुंना 70 हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - Essential things distribution shahuwadi
जीवनावश्यक 18 वस्तू आणि साडी अशी 70 हजार किमतीचे 60 किट बनवले आणि मदत म्हणून वस्तीवरील गोरगरीब गरजू लोकांना वाटप केले.