ETV Bharat / state

Sangli Murder News : दारुच्या नशेत पत्नीसोबत भांडण; अडीच वर्षाच्या मुलाचा बापाने केला खून - चारित्र्याच्या संशयातून पत्नी सोबत झाले भांडण

चारित्र्याच्या संशयातून पत्नी सोबत झालेल्या भांडणातून ( Quarrel with wife due to suspicion of character ) रागाच्या भरात थेट अडीच वर्षाच्या मुलाचा पित्याने निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक घटना ( boy killed by his father in Sangli ) कडेगावच्या शिवाजीनगर येथे घडली आहे.

Suspect Arjun Sawant
संशयित अर्जुन सावंत
author img

By

Published : Sep 22, 2022, 10:08 AM IST

सांगली : पत्नीसोबत चारित्र्य संशयातून झालेल्या भांडणामधून थेट अडीच वर्षाच्या मुलाचा एका बापाने निर्घृण खून केल्याची ( boy killed by his father in Sangli) धक्कादायक घटना घडली आहे.फरशीवर आपटुन हा निर्दयी खून करण्यात आला आहे. आयुष सावंत असे मृत चिमुरड्याचे नाव असून या प्रकरणी अर्जुन सावंत याच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Two and a half year old boy was killed by his father )

चारित्र्याच्या संशयातून झाले भांडण : चारित्र्याच्या संशयातून पत्नी सोबत झालेल्या भांडणातून रागाच्या भरात थेट अडीच वर्षाच्या मुलाचा, पित्याने निर्दयपणे खून केल्याची धक्कादायक घटना कडेगावच्या शिवाजीनगर येथे घडली आहे. आयुष सावंत, या अडीच वर्षाच्या मुलाला संशयित अर्जुन सावंत या पित्याने दारुच्या नशेत पत्नी सोबतच्या भांडणाच्या रागातून फरशीवर आपटून अमानुषपणे ठार केले आहे.

कडेगाव पोलिसांकडून मिळाली माहीती : शिराळा तालुक्यातल्या अंत्री बुद्रुक येथे राहणारा अर्जुन सावंत याचा विवाह 2016 मध्ये कडेगाव येथील पिंकी यांच्याशी झाला होता, सध्या दोघेही पिंकी यांचे माहेर कडेगाव येथील शिवाजीनगर येथे राहतात. सावंत दांम्पत्याला अडीच वर्षाचा आयुष हा मुलगा होता. पण अर्जुन याला दारूचे व्यसन असल्याने, यातून अर्जून हा पत्नी पिंकी यांच्यावर चारित्र्याचा संशय घेत असे, यामधून दोघा पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण देखील होतं. दरम्यान 20 सप्टेंबर मंगळवार रोजी पिंकी सावंत या कामावरून सायंकाळी घरी पोहोचल्या, त्यावेळी पती अर्जुन हा घरामध्ये होता यावरून पिंकी सावंत यांनी पती अर्जुन याला कामावर का गेला नाही, याबद्दल विचारणा केली. ज्यातून पिंकी आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद झाला. यानंतर अर्जुन हा घरातून बाहेर निघून गेला व दारू पिऊन घरी आला. यानंतर पिंकी आणि अर्जुन यांच्यामध्ये चरित्राच्या संशयातून भांडण सुरू झाले. पिंकी यांचे नातेवाईक देखील घरामध्ये आले, त्यानंतर वाद पुन्हा वाढला. ज्यातून रागाच्या भरात दारुच्या नशेत अर्जुन यांनी आपल्या अडीच वर्षाच्या आयुषला जवळ घेऊन जोरात फरशीवर आपटले. यामध्ये आयुष हा रक्तबंबाळ झाला होता. त्यानंतर त्याला कराडच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना आयुषचा मृत्यू झाला आहे. कडेगाव पोलीस ठाण्यामध्ये संशयित अर्जुन सावंत याच्या विरोधात त्याच्याच अडीच वर्षाच्या मुलाच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला,असून अधिक तपास कडेगाव पोलीस करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.