ETV Bharat / state

'राज्य तर शरद पवार चालवतात मग उद्धव ठाकरेंना भेटून काय उपयोग?'

author img

By

Published : Oct 29, 2020, 3:32 PM IST

Updated : Oct 29, 2020, 7:12 PM IST

सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मला विचाराल तर आता शरद पवार हेच राज्य चालवतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग आहे. एखादा प्रश्न सुटायचा असेल तर शरद पवारांना भेटायला पाहिजे, असे पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

सांगली - महाराष्ट्र सरकारचा कारभार शरद पवार चालवतात, असा टोला चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे हे बाहेर पडत नाहीत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. राज्यपालांनी राज ठाकरेंना शरद पवारांना भेटण्याच्या सल्ल्यावरून चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना हा टोला लगावला आहे. तसेच गेल्या सहा महिन्यात माझ्या एकाही पत्राला मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलं नाही, असंही पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर कांद्याच्या प्रश्नावरून राज्य शासनाने व्यापाऱ्यांना दंडूका दाखवण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा -

सांगली महापालिकेच्या विविध विकासकामांचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, 'राज्यात कोरोनाच्या लॉकडाऊननंतर एकेक गोष्टी हळूहळू सुरू करायला काही हरकत नाही. मात्र, सरकार का करत नाही हे समजत नाही. आता राज्यातली मंदिरं सुरू झाली पाहिजेत, लोकल ट्रेनही सुरू होणे गरजेचे आहे आणि या ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाने आराखडा तयार करायला हवा.'

...म्हणून पवारांचे कौतुक -

मंदिरात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑनलाइन प्रवेश देण्याची व्यवस्था केली गेली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच पंकजा मुंडे यांनी शरद पवार यांच्या पाहाणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केलेले कौतुक यावरून बोलताना, कौतुक करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार हे या वयात बाहेर पडले, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी त्यांचे कौतुक केले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र बाहेर पडत नाहीत, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

शरद पवार हेच राज्य चालवताहेत -

राज ठाकरेंनी राज्यपाल यांची घेतलेली भेट आणि नंतर राज्यपालांनी राज यांना शरद पवारांना भेटण्याचा दिलेला सल्ला, यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, राज ठाकरे हे स्पष्ट बोलतात आणि राज्यपालांनी राज ठाकरे यांना असं का सांगितलं त्यामागे त्यांचा काय हेतू आहे, हे माहीत नाही. मात्र, मला विचाराल तर
आता शरद पवार हेच राज्य चालवतात त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग आहे. एखादा प्रश्न सुटायचा असेल तर शरद पवारांना भेटायला पाहिजे. कारण, ना उद्धव ठाकरे प्रवास करतात, ना कॉन्फरन्स करतात. मंदिर उघडण्यासाठी मागे लागलो आहोत, पण ते प्रश्न समजायला तयार नाहीत. दुसऱ्या बाजूला मात्र या शरद पवार, देवेंद्र फडणवीस हे लोकांना सहज उपलब्ध होतात, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भेटून काय उपयोग असा सवाल लोक करतात. इतकच नव्हे तर गेल्या सहा महिन्यात मी पाठवलेल्या एका पत्राचेसुद्धा उत्तर मुख्यमंत्री कार्यालयातून आलेले नाही, अशी खंतही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

कांद्याचा प्रश्न व्यापाऱ्यांमुळेच -

तसेच राज्यातल्या कांदा प्रश्नावर बोलताना राज्यातल्या कांद्याचा प्रश्न हा शेतकऱ्यांनी नव्हे तर व्यापाऱ्यांनी निर्माण केलेला आहे. व्यापाऱ्यांची अडवणुकीची ही भूमिका आहे. आपण या कांद्याच्या प्रश्नावरून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना साठवणुकीच्या बाबतीत परवानगी देण्याची मागणीसुद्धा केली आहे. मात्र, राज्य सरकारनेही व्यापाऱ्यांच्या अडवणुकीच्या बाबतीत दंडूका दाखवण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - इस्लामपुरात दुचाकीच्या धडकेत चिमुकली गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद

Last Updated : Oct 29, 2020, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.