ETV Bharat / state

पक्षात साधू-संन्यास्यांना सर्वोच्च स्थान, त्यांचं राजकारणात काय काम? भाजप आमदाराने काढले पक्षाचेच वाभाडे - सांगली

भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे ज्यांनी लोभ, मोह, क्रोध यांच्यावर विजय मिळवला आहे. मात्र, आज भगवे वस्त्र परिधान करतात आणि खासदरकीला उभे राहतात. स्वामी-महाराजांनी त्यांचे काम करायला पाहीजे. त्यांनी जकारणात येऊ नये, असा सल्लाही भाजप आमदार विलास जगताप यांनी यारावेळी दिला.

भाजप सरकारचे वाभाडे काढताना भाजप आमदार विलास जगताप
author img

By

Published : Jun 21, 2019, 7:58 AM IST

Updated : Jun 21, 2019, 9:13 AM IST

सांगली - भाजप आमदार विलास जगताप यांनी साधू-महाराजांवर जोरदार टीका करीत भाजप सरकारचे वाभाडे काढले. साधू-संन्यासी, महाराज हे बदमाश आहेत. त्यांचे राजकारणात काय काम आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. जत येथील एका जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.

भाजप सरकारचे वाभाडे काढताना भाजप आमदार विलास जगताप

भाजपमध्ये साधू-संन्यासी आणि महाराजांना सर्वोच्च स्थान देण्यात येत आहे. निवडणुकीत उमेदवारीपासून मंत्री पदापर्यंत भाजपकडून साधू-संन्यास्यांना मान देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. सोबतच सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेशवर स्वामी यांच्यावरही निशाणा साधला. तसेच कीर्तनकार आणि पुरंदरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. ज्ञानेश्वरी वाचन, कीर्तन करण्याचा बाजार इंदुरीकर, बाबा सातारकर महाराज आणि कीर्तनकारांनी मांडला आहे. तसेच बाबा पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. त्याच पुरंदरेंना सरकारकडून महाराष्ट्र भूषण देण्यात आला आहे. त्यामुळे सरकार कुठल्या दिशेने निघाले असल्याचा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

राजकारणात चांगल्या गुणांना वाव राहिलेला नाही. सोलापूर मतदारसंघात भाजपचे सिद्धेश्वर स्वामी निवडून आले आहे. त्यांचे राजकारणात काय काम आहे. तसेच हे स्वामी लोक राजकारणात का येत आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एवढेच नाहीतर सोलापूर मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे ज्यांनी लोभ, मोह, क्रोध यांच्यावर विजय मिळवला आहे. मात्र, आज भगवे वस्त्र परिधान करतात आणि खासदरकीला उभे राहतात. स्वामी-महाराजांनी त्यांचे काम करायला पाहीजे. त्यांनी राजकारणात येऊ नये, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. विशेष म्हणजे भाजप पक्षाचे आमदार असून पक्षाशी बांधील असल्याचेही आमदार जगताप यांनी यावेळी सांगितले.

Intro:सरफराज सनदी - सांगली .

AVB

Exclusive

Feed send file name - MH_SNG_BJP_AAMDAR_ON_SADHU_21_JUNE_2019_VIS_1_7203751

स्लग - खुद्द भाजपा आमदारानेचे काढले साधू-संन्याशी व महाराजांसह भाजपाचे खुलेआम वाभाडे, बदमाश साधू महाराजांचे राजकारणात काय काम - भाजपा आमदार विलासराव जगताप .

अँकर - भाजपा आमदार असणारया विलासराव जगताप यांनी देशातील साधू-संन्याशी आणि महाराजांची जोरदार खिल्ली उडवली आहे.साधू-संन्याशी ,महाराज हे बदमाश असून त्यांचे राजकारणात काय काम आहे ? असा सवाल उपस्थित करत महाराज,साधू यांच्यासोबत भाजपा सरकारचेही वाभाडे काढले आहे.सांगलीच्या जत मध्ये एका जाहीर कार्यक्रमात जगताप यांनी ही वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.Body:व्ही वो - भाजपा मध्ये साधू-संन्याशी आणि महाराज यांना आज सर्वोच्च स्थान देण्यात येत आहे.निवडणूकीत उमेदवारी पासून मंत्री पदा पर्यंत भाजपाकडून साधू-संन्याशांना मान देण्यात येत आहे. यामुळे भाजपात साधू-संन्याशी आणि महाराज यांना किती महत्व आहे.हे स्पष्ट असुन,असे असताना सांगलीचे जत मतदार संघाचा खुद्द भाजपा आमदार विलासराव जगताप यांनी देशातील साधू-संन्याशी आणि महाराज यांचे वाभाडे काढले आहेत.ते सुद्धा एका जाहीर कार्यक्रमात,तर भाजपाच्या सोलापूरचे खासदार जयसिद्धेशवर स्वामी यांच्यावरही निशाणा साधत,कीर्तनकार आणि पुरंदरे यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.आज ज्ञानेश्वरी वाचन कीर्तन करण्याचा बाजार इंदुलकर ,बाबा सातारकर महाराज आणि कीर्तनकारांनी
मांडल्याची जोरदार टीका केली.तसेच ज्या बाबा पुरंदरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली ,त्या पुरंदरे यांना सरकारकडून महाराष्ट्र भूषण देण्यात आला,त्यामुळे सरकारचा काय चाललंय, कुठल्या दिशेने निघाले आहे.हे ऐकून आपली मती गुंग होते,अश्या शब्दात संताप व्यक्त करत ,मी प्रतिगामी नसून पुरोगामी असल्याचे स्पष्ट करत,
आज निवडणूक भ्रष्टाचारी मार्गाने होत आहेत,आणि ज्याच्याकडे पैसा.संघटना शक्ती आशे व्यक्ती निवडून येत आहेत.
आणि चांगल्या गुणांना आत राजकारणात फार कमी वाव राहिला नाही अशी खंत व्यक्त करत , निवडून आलेल्या 542 खासदारांच्या बाबतही प्रश्न उपस्थित करून सोलापूर मतदारसंघात पराभूत झालेले काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार यांच्या बद्दल स्तुतीसुमन उधळून,सोलापूर मतदार संघात आमच्या पक्षाचे सिद्धेशवर स्वामी निवडून आले आहेत, यांच संसदेमध्ये काय काम आहे, आणि हे स्वामी लोक राजकारणात का येत आहेत.असा उद्विग्न प्रश्न आमदार जगताप यांनी उपस्थित करत, त्यांनी त्यांचे काम केले पाहिजे,तसेच भगवे वस्त्र परिधान करणे म्हणजे ज्यांनी लोभ,मोह ,क्रोध यांच्यावर विजय मिळवला आहे, पण आज भगवे वस्त्र परिधान करतात आणि खासदरकीला उभे राहतात.अश्या शब्दात जगताप यांनी निवडून आलेल्या महाराजांचा समाचार घेतला. तसेच देशातील बहुतांशी साधू संन्याशी हे बदमाश आहेत. असे वादग्रस्त व्यक्तव्य करत स्वामी- महाराजांचे जे काम आहे ते त्यानी केले पाहिजे,असा सल्लाही,यावेळी आमदार जगताप यांनी दिला आहे.विशेष म्हणजे हे खळबळ जनक विधाने करतांना आमदार जगताप यांनी आपण भाजपात आहोत , पक्षाशी बांधील आहोत ,हे सुद्धा आवर्जून सांगितले .

बाईट - विलासराव जगताप -
आमदार,भाजपा,जत, सांगली
Conclusion:
Last Updated : Jun 21, 2019, 9:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.