ETV Bharat / state

क्रिकेटच्या मैदानात नियतीने हरवले मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने जिंकवले - अतुल पाटील ढवळी ग्रामपंचायत विजय

१६ जानेवारीला सांगलीतील आटपाडी येथे क्रिकेट खेळताना एका तरुणाचा मैदानात मृत्यू झाल्याची घटना घडली. या तरुणाचा ग्रामपंचायत निवडणुकीत विजय झाला आहे.

Atul Patil
अतुल पाटील
author img

By

Published : Jan 19, 2021, 9:33 AM IST

सांगली - काही दिवसांपूर्वीच क्रिकेटच्या मैदानात नियतीने त्याला हरवले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात जनतेने त्याला विजयी केले. तासगाव तालुक्यातील ढवळी येथील तरुणाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्यांनी ग्रामपंचायतची निडवणूक लढवली होती. उमेदवार असणाऱ्या अतुल पाटील यांचा काल झालेल्या मतमोजणीमध्ये विजय झाला आहे.

नशिबाचा असा ही खेळ -

क्रिकेट खेळताना एका औषध विक्रेत्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना १६ जानेवारीला घडली होती.अतुल पाटील असे या तरुणाचे नाव होते. अतुल हे तासगाव तालुक्यातील ढवळी गावचा माजी उपसरपंच होते. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात ते भाजपा गटाचा उमेदवार म्हणून उभे होते. अतुल पाटील यांचे गावात औषधाचे दुकान आहे. ते सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे सदस्य सुद्धा होते. केमिस्ट असोसिएशनच्यावतीने दरवर्षी प्रमाणे क्रिकेटच्या स्पर्धा आटपाडी याठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत अतुल हे तासगाव तालुका संघाच्यावतीने खेळाडू म्हणून खेळत होते. खेळाच्या दरम्यान यष्टीरक्षण करताना अतुल यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

क्रिकेटच्या मैदानात झाला मृत्यू -

अतुल हे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचे खासदार संजयकाका पाटील गटाकडून उमेदवार होते. 15 जानेवारी रोजी गावात मतदान झाले आणि त्यानंतर 16 जानेवारीला ते आटपाडी येथे क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. या दरम्यान त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडीओसुद्धा समोर आला होता.

मैदानात हरला अन् निवडणुकीत जिंकला -

सोमवारी ढवळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये अतुल पाटील 333 मतांनी विजय झाले आहेत. अतुल पाटील याच्या निधनानंतर निवडणुकीचा निकाल लागला आहे. अतुल पाटील याचा विजय झाला मात्र, हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी अतुल पाटील हयात नाहीत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.