सांगली - रुग्ण घेऊन निघालेल्या शासकीय अॅम्ब्युलन्स आणि दुचाकीचा अपघात होऊन एक मुलगा ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिरजेतील पंढरपूर मार्गावर हा अपघात झाला. संदीप घुगडे या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे.
मिरजेच्या पंढरपूर रोडवरील रमाई मंगल कार्यालयासमोर १०८ या शासकीय अॅम्ब्युलन्स आणि टीव्हीएस दुचाकी या वाहनांचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकी चालवणारा संदीप चंद्रकांत घुगाडे (वय १७) हा ठार झाला आहे. त्याचा लहान भाऊ संकेत घुगाडे (वय १५) हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघे भाऊ आपल्या दुचाकीवरून जात असताना कवठेमहांकाळच्या अगळगाव येथून एक रुग्ण घेऊन शासकीय 108 अॅम्ब्युलन्स ही मिरजेकडे येत होती, यावेळी दोन्ही वाहनांची समोरा-समोर धडक झाली. या अपघाता नंतर नागरिकांना तातडीने दोघा भावांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू आसताना संदीप चंद्रकांत घुगाडे याचा मृत्यू झाला. या अपघाताची मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.