रत्नागिरी - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, महाड, पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केलेल्या मुख्यमंत्र्यांबद्दल विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यभर राणेंच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. काही वेळापूर्वीच रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक अटकेसाठी पोहोचले होते. पण त्यांच्याकडे अटक वॉरंट किंवा कारवाईसाठी अन्य कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसल्याने राणेंनी खोलीतून बाहेर येण्यास नकार दिला होता. मात्र, आता नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.