ETV Bharat / state

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी एकवटले, रत्नागिरीत संप

देशातील दहा बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याच विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. रत्नागिरीतही हा संप पुकारण्यात आला.

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात संप
author img

By

Published : Oct 22, 2019, 11:12 PM IST

रत्नागिरी - भारत सरकारकडून देशातील दहा बँकाच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याच विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारला. रत्नागिरीतही हा संप पुकारण्यात आला. यावेळी बँक कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत सरकारच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.

हेही वाचा - मुंबईत बँक कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आज पुन्हा संप

या निर्णयाविरोधात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि फेबी या संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला. सरकार एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करत आहे. तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातील स्मॉल फायनान्स बँकांना परवाने दिले जात आहेत. सरकारचे हे धोरण मागील दरवाजाने बँक व्यवसायाचे खासगीकरण करणारे असल्याचा आरोप करत संप पुकारण्यात आला.

बँकांच्या विलिनीकरणाविरोधात संप

याविषयीची माहिती रत्नागिरी बँक कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी दिली आहे. या संपात जिल्ह्यातील जवळपास एक हजार कर्मचारी सहभागी झाले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. संपकरी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवला.

हेही वाचा - इकबाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला ईडीकडून अटक, प्रफुल पटेलांच्या अडचणीत वाढ

Intro:बँकाच्या विलिनिकरणाविरोधातील बँक कर्मचाऱ्यांचा संप रत्नागिरीतही यशस्वी

रत्नागिरी, प्रतिनिधी

देशातील 10 बँकाच्या विलिनिकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. रत्नागिरीतही बॅक कर्मचाऱ्यांचा हा संप यशस्वी झाला. बॅक कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत सरकारच्या या धोरणाचा निषेध नोंदवला.
भारत सरकारकडून दहा बॅकाच्या विलिनिकरणाचा निर्णय़ घेण्यात आला आहे. या निर्णय़ाविरोधात आँल इंडिया बॅक एल्पाॅईज असोसिएशन आणि फेबी या संघटनांनी आज देशव्यापी संप पुकारला. सरकार एकीकडे सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद करत आहे. तर दुसरीकडे खासगी क्षेत्रातील स्मॉल फायनान्स बँकांना परवाने दिले जात आहेत. सरकारचे हे धोरण मागील दरवाजाने बँक व्यवसायाचे खासगीकरण करायचे आहे असा आरोप करत आजचा संप पुकारण्यात आला होता. रत्नागिरीतही हा संप यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी बँक कर्मचारी समन्वय समितीचे सरचिटणीस राजेंद्र गडवी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच जिल्ह्यातील जवळपास एक हजार कर्मचारी सहभागी झाली असल्याची माहिती तडवी यांनी दिली. संपकरी कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शन करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध दर्शवला.

Byte ---Body:बँकाच्या विलिनिकरणाविरोधातील बँक कर्मचाऱ्यांचा संप रत्नागिरीतही यशस्वीConclusion:बँकाच्या विलिनिकरणाविरोधातील बँक कर्मचाऱ्यांचा संप रत्नागिरीतही यशस्वी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.