रत्नागिरी - महाविकास आघाडीतील मंत्री नबाव मलिक यांचे कॅबिनेटमध्ये कौतुक झाल्यानंतर आता शिवसेनेकडूनदेखील नबाल मलिक यांचे कौतुक केले जात आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार भास्कर जाधव यांनी नवाब मलिक यांची स्तुती केली आहे. नबाव मलिक यांचे विशेष कौतुक करताना भास्कर जाधव यांनी म्हटले आहे, की भारतीय जनता पार्टी के हर एक सवाल का जवाब एक नवाब है, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - कोकणच्या विकासासाठी पुढाकार घ्या, भास्कर जाधवांचे गडकरींना पत्र
'मलिकांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे'
नवाब मलिक आज ज्या पद्धतीने लढताहेत, भारतीय जनता पार्टीचे जे काही गुंडाराज सुरू आहे ते जर थांबवायचे असेल, न्यायाने आणि सत्याने तसेच कायद्याने हे राज्य चालावे असे वाटत असेल तर नवाब मलिक यांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले आहे.
हेही वाचा - आमदार भास्कर जाधव यांचे पारंपारिक 'जाखडी नृत्य', पाहा व्हिडिओ...
'सत्य बोलणाऱ्याला भाजपाकडून केले जाते नामोहरम'
सत्य बोलणाऱ्याला नामोहरम कसे करायचे हे भाजपाकडून प्लॅन केले जात असल्याचा आरोपदेखील आमदार भास्कर जाधव यांनी यावेळी केला.