ETV Bharat / state

फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; रत्नागिरीतील केळ्ये-आंबेकोंड परिसरातील घटना

रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या केळ्ये-आंबेकोंड परिसरात शेतात लावून ठेवलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची बाब सोमवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

leopard
बिबट्याची सुखरुप सुटका
author img

By

Published : Jan 19, 2021, 3:32 PM IST

रत्नागिरी - फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका वनविभागाकडून करण्यात आली आहे. रत्नागिरीतील केळ्ये-आंबेकोंड परिसरातील ही घटना आहे.

फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

रत्नागिरी शहरापासून जवळ असलेल्या केळ्ये-आंबेकोंड परिसरात शेतात लावून ठेवलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची बाब सोमवारी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्याविषयी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून वनविभागाने त्याठिकाणी तात्काळ धाव घेतली. त्यांनी फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

फासकीमध्ये बिबट्या अडकला

आंबेकोंडवाडी येथील वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर, यांचे शेतामध्ये फासकीमध्ये बिबट्या अडकला असल्याचे तेथील नागरिकांच्या निदर्शनास आले. मोठा बिबट्या असल्याचे पाहून तेथील ग्रामस्थांची देखील मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी या घटनेची खबर पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांना देण्यात आली. पाटील यांनी तात्काळ त्याबाबत सकाळी 10.00 वाजता दुरध्वनीवरून रत्नागिरी वनरक्षक यांना कळविले. ही खबर मिळताच तात्काळ घटनास्थळी परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी , वनपाल संगमेश्वर, वनपाल पाली व कर्मचारी यांचे समवेत मजगाव ( आंबेकोंडवाडी) येथे जाऊन वस्तूस्थितीची खात्री करण्यात आली.

बिबट्याची सुखरुप सुटका
बिबट्याची सुखरुप सुटका

फासकी तोडून बिबट्याची फासकीमधून केली सुटका

त्यावेळी वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांना बिबटया फासकीमध्ये अडकल्याचे दिसून आले. फासकीत अडकलेल्या बिबट्याला सोडविणे गरजेचे होते. त्यासाठी सर्व यंत्रणा विलंब न लावता कामाला लागली. फासकीमध्ये अडकलेल्या बिबट्याला कटरच्या सहाय्यने फासकी तोडून फासकीमधून सुटका करण्यात आली. आणि त्याला पिंजऱयात जेरबंद करण्यात आले. हा बिबट्या पाहून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी देखील अचंबित झाले. कारण जेरबंद केलेला बिबट्या मादी जातीचा व त्याचे वय अंदाज 10 वर्षांचा असल्याचा बांधण्यात आला आहे. त्या बिबटयास पिंजऱयात घेऊन पशुवैदयकिय अधिकारी, रत्नागिरी-यांचे कडून तपासणी करून घेतली. तो बिबटया सुस्थितीत असल्याचे पशुवैद्यकिय अधिकारी, रत्नागिरी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.