रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाचे थैमान माजल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. खेड येथील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गाला याचा फटका बसला. शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या वाजण्याच्या सुमारास नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीवरील ब्रिटीशकालीन पुलावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. पाणीपातळी कमी झाल्यानंतर ही वाहतूक २ तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यावेळी खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत करत होते.
मुंबई-गोवा महामार्ग या आठवड्यात तिसऱ्यांदा ठप्प झाला आहे. दक्षिण रत्नागिरीत पावसाचा जोर मंदावला असला तरी उत्तर रत्नागिरीत मात्र पावसाचा जोर कायम आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीने शुक्रवारी सकाळी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सकाळी ६:४५ पासून नदीवरील पुलावरून वाहतूक बंद होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र, आता नदीची पाणीपातळी कमी झाल्याने २ तासांनंतर या मार्गावरील वाहतूक हळुहळू पूर्ववत करण्यात आली. तर खेड येथील मदत ग्रुपचे सहकारी पोलिसांसोबत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.