ETV Bharat / state

रत्नागिरीला मिळणार दोन नव्या बाजार समित्या - Ratnagiri latest news

पश्चिम महाराष्ट्रासह बहूतांश जिह्यात तालुकानिहाय बाजार समित्या स्थापन केलेल्या आहेत. शेतीचे क्षेत्र आणि विविध उत्पादने त्या भागात असल्यामुळे तेथील कारभार समित्यांमार्फत चालतो. कोकणात आंबा, काजूचे क्षेत्र अधिक असले तरीही हा माल जिल्ह्याच्या बाहेरच पाठवला जातो. बागायतदारही तयार झालेला माल मुंबई, पुणे, अहमदाबादला पाठवतात.

रत्नागिरीला मिळणार दोन नव्या बाजार समित्या

author img

By

Published : Feb 10, 2021, 11:56 AM IST

Updated : Feb 10, 2021, 2:18 PM IST

रत्नागिरी- जिल्हा कृषी उप्तन्न बाजार समितीचे विभाजन करुन आणखीन दोन समित्या स्थापन करण्याच्यादृष्टीने पणन विभागामार्फत हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी खेड- दापोली- मंडणगडचे आमदार योगेश कदम यांनी पुढाकार घेतला आहे. पणन मंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हा उपनिबंधककडून अहवाल पणनला सादर करण्यात आला आहे.

रत्नागिरीला मिळणार दोन नव्या बाजार समित्या

आमदार योगेश कदम यांचा पुढाकार

जिल्ह्याची एकमेव कृषी उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीत आहे. जिल्ह्याच्या टोकावरती असलेल्या शेतकऱ्यांना बाजार समितीचा फायदा होत नाही. जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विभाजनाचा प्रस्ताव पणन मंडळाला सादर केला होता. त्या प्रस्तावाला अनुकुलता दर्शवण्यात आली आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. योगेश कदम यांनी मंडणगड आणि राजापूर येथे बाजार समिती सुरू करा, अशी मागणी केली होती. जिल्हा उपनिबंधकांनी सर्वे करून नवीन बाजार समित्यांचे कार्यक्षेत्र कसे असावे याचा अहवाल तयार केला आहे. तो पणन महामंडळालाही सादर केला आहे.

कोकणातला माल जिल्ह्याच्या बाहेर
पश्चिम महाराष्ट्रासह बहूतांश जिह्यात तालुकानिहाय बाजार समित्या स्थापन केलेल्या आहेत. शेतीचे क्षेत्र आणि विविध उत्पादने त्या भागात असल्यामुळे तेथील कारभार समित्यांमार्फत चालतो. कोकणात आंबा, काजूचे क्षेत्र अधिक असले तरीही हा माल जिल्ह्याच्या बाहेरच पाठवला जातो. बागायतदारही तयार झालेला माल मुंबई, पुणे, अहमदाबादला पाठवतात. स्थानिक बाजार समितीला म्हणावा तसा उपयोग होत नाही. परजिह्यातील व्यापारी येथे आणून व्यावसाय करण्याचा नवा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिह्यातील बाजार समितीला दापोलीतील शेतकऱ्यांकडून सर्वाधिक उत्पन्न मिळते. तुलनेत सोयीसुविधा मिळत नाहीत. मंडणगडमधील काही शेतकरी रायगडमध्ये बाजार समितीत माल घेऊन जातात. त्यांना आपल्या भागाकडे वळवण्यासाठी ही संकल्पना यशस्वी होईल. त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांसाठी वेगळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार योगेश कदम यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे पणन मंडळाकडून ग्रिन सिग्नल आल्यावर मंडणगड आणि राजापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा मार्ग मोकळा होणार आहे.

Last Updated : Feb 10, 2021, 2:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.