ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी हे आदेश काढलेत.

corona virus ratnagiri
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू
author img

By

Published : Mar 16, 2020, 4:56 PM IST

Updated : Mar 16, 2020, 5:17 PM IST

रत्नागिरी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हे आदेश काढलेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा विषयक कार्यक्रमांना पुढील आदेश होईपर्यंत परवानगी देण्यात येऊ नये तसेच यापूर्वी देण्यात आली असल्यास सदर परवानगी रद्द करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

या सर्व सूचना व आदेश रत्नागिरी जिल्ह्यातही लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपायांसाठी तसेच अन्य घटना, सण या पार्श्वभूमीवर २९ मार्च २०२० पर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे साऱ्यानी पालन करावे, असे आवाहन जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) (सन 1951 चा कायदा 22) नुसार मिळालेल्या अधिकारान्वये 15 मार्च 2020 पासून ते 29 मार्च 2020 पर्यंत जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई -

शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशी शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या अगर कोणतीही वस्तू जवळ बाळगणे, कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे, व्यक्तीचे किंवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, अशा प्राधिकाऱ्याच्या मते ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धक्का पोहोचेल अशी किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे किंवा विडंबन करणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे, त्याचे प्रदर्शन करणे किंवा त्याचा प्रसार करणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना किंवा कोणत्याही जमावास विनापरवानगी एकत्र येण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. सदरचे आदेश अंतयात्रा, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी या बाबीना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रित येणे आवश्यक झाल्यास त्यासाठी संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशीत केले आहे.

हेही वाचा -

कोरोना इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचे मंदिर बंद

कोरोनाने अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम टाळण्यासाठी आरबीआयकडे सर्व पर्याय तयार

Coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयित 68 वर्षीय नागरिकाचा मृत्यू

Last Updated : Mar 16, 2020, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.