रत्नागिरी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कामगिरी देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी राज्य सरकारकडून पोलीस व्हॅनचे रुपांतर सॅनिटायझर व्हॅनमध्ये करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता रत्नागिरीमध्ये देखील पोलिसांकरिता सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
या व्हॅनमध्ये गेल्यानंतर सॅनिटायझरची फवारणी अंगावरती होते. यातील सिस्टम स्वयंचलीत आहे. कोरोनाच्या काळात पोलिसांनी देखील काळजी घ्यावी. त्यांना संसर्गाचा कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून ही व्हॅन तयार करण्यात आली आहे.
पोलिसांकडून नागरिकांमध्ये कोरोनाबाबात जनजागृती देखील केली जात आहे. शहरातील काही प्रमुख ठिकाणी ही व्हॅन जात आहे. यावेळी सोबत बँड पथक देखील असते. या बँड पथकाच्या माध्यमातून नागरिकांनी काळजी घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले जात आहे. देशभक्तीपर गीतही बँडपथक वाजवताना दिसत आहे.