ETV Bharat / state

ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, राष्ट्रवादीची मागणी - माजी आमदार संजय कदम

राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तहसीलदार ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

मोर्चात सहभागी कार्यकर्ते
author img

By

Published : Nov 7, 2019, 1:36 PM IST

रत्नागिरी - 'असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय जात नाही, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा! या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय,' अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला. कोकणातील शेतकरी संकटात सापडला असून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

क्यार वादळामुळे हर्णे बंदरातील छोट्या डिंग्या वाहून जाऊन मच्छिमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत भातशेतीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा. तसेच, सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी या मोर्चाद्वारे केली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष जयवंत जळगावकर, पंचायत समिती सभापती राजेंद्र गुजर जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे मान्यवरांचा शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Intro:ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

दापोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढत राष्ट्रवादीची मागणी

रत्नागिरी, प्रतिनिधी

असा कसा देत नाही ,घेतल्याशिवाय जात नाही ,जाहीर करा---- जाहीर करा ----ओला दुष्काळ जाहीर करा! या सरकारचे करायचे काय खाली डोकं वर पाय 'अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली दापोली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला.. कोकणातील शेतकरी संकटात सापडला असून कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करावे या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
क्यार वादळामुळे हर्णे बंदरातील छोट्या  डिंग्या वाहून जाऊन मच्छिमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत भातशेतीचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा. तसेच सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी या मोर्चाद्वारे केलीे. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष जयवंत जळगावकर, पंचायत समिती सभापती राजेंद्र गुजर जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे मान्यवरांचा शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.Body:ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

दापोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढत राष्ट्रवादीची मागणी
Conclusion:ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा

दापोली तहसील कार्यालयावर मोर्चा काढत राष्ट्रवादीची मागणी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.