ETV Bharat / state

Ramdas Kadam : आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा अनिल परब यांचा कट - रामदास कदम - Murder conspiracy

योगेशचा कदम अपघात ( Yogesh Kadam accident ) नसून घातपाताचा कट ( Conspiracy to kill Yogesh Kadam ) असल्याचा आरोप रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी केला आहे. मातोश्रीच्या आशिर्वादाने अनिल परब ( Anil Parab ) यांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा कट रचल्याचे ( Dapoli Mandangarh MLA Yogesh Kadam ) ते म्हणाले.

Ramdas Kadam
रामदास कदम
author img

By

Published : Jan 7, 2023, 9:21 PM IST

रत्नागिरी : योगेश कदम ( Yogesh Kadam accident ) यांच्या गाडीला झालेला अपघात हा कट ( Conspiracy to kill Yogesh Kadam ) असल्याचा संशय रामदास कदम ( Ramdas Kadam ) यांनी व्यक्त केला आहे. मातोश्रीच्या आशीर्वादाने अनिल परब ( Anil Parab ) यांनी योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हा अपघात म्हणजे कट कारस्थान तर नाही ना? अशी शंका कदम यांनी उपस्थित केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अपघात की अपघात ? दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात ( Yogesh Kadam accident ) हा कट असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला आहे. हा अपघात होता की अपघात, अशी शंका रामदास कदम यांनी व्यक्त केली. माझ्याकडे गृहखातेही होते. मलाही काही गोष्टी माहित आहेत. पोलिसांची गाडी मागे असताना डंपरने योगेश कदम यांच्या गाडीला धडक कशी दिली, असा सवाल कदम यांनी केला आहे. योगेश कदम यांच्या हत्येचा प्रयत्न करणार्‍या अनिल परब सारख्या लोकांवर मातोश्रीच्या आशीर्वाद असल्याचे देखील ते म्हणाले.

मुख्यमंत्री करणार चर्चा - योगेश कदम यांच्या अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. आमदारांच्या गाडीच्या पुढे, मागे पोलिस बंदोबस्त असतानाही डंपरने गाडीला मध्येच धडक दिली. मागून एक डंपर येतो, कारला मधेच धडकतो, ती 150 फूट उडून जाते हे कसे शक्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

योगेश कदम यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय - मी रायगड पोलिस अधिकाऱ्यांशी बोललो आहे. योगेश कदम यांच्या हत्येचा कट रचल्याचा संशय असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात यावी. रामदास कदम म्हणाले की, योगेश कदमचा खून करण्याचा प्रयत्न झाला आहे. अनिल परब यांच्यासारखी माणसे मातोश्रीच्या आशीर्वादाने हे काम करतात की काय, अशी मला शंका आहे, असे रामदास कदम म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.