ETV Bharat / state

MS-CIT आता 2 प्रकारात; MKCL च्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती - MSCIT can now be done in two ways SAID MKCL Managing Director Vivek Sawant

यामुळेच MS-CIT चे नवीन स्वरूप महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने सादर केले आहे. MS-CIT आता 2 प्रकारात होणार आहे. MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी ही माहिती दिली आहे.

MKCL Managing Director Vivek Sawant
MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत
author img

By

Published : Dec 10, 2019, 8:45 PM IST

रत्नागिरी - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी अपेक्षांमध्ये बदल झाले आहेत. MS-CIT कोर्सची संरचना आता केवळ शासकीय नोकरीसाठी उपयुक्त कोर्स किंवा आयटी अवेअरनेस अशी राहिली नाही. त्यामध्ये त्वरित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे, जॉबसाठी तयार करणारे बदल करणे आवश्यक आहे. यामुळेच MS-CIT चे नवीन स्वरूप महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने सादर केले आहे. MS-CIT कोर्स आता जॉब रेडीनेस व आयटी अवेअरनेस अशा दोन पर्यायात उपलब्ध होणार आहे, अशी माहिती MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी गणपतीपुळे येथील पत्रकार परिषदेत दिली.

MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची प्रतिक्रीया

हेही वाचा... ईशान्येकडील राज्यांत नागरिकत्व विधेयकाचे पडसाद, १२ तासांचा कडकडीत बंद

गणपतीपुळे येथे मंगळवारी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन दशकांत तब्बल सव्वा कोटीहून अधिक जाणकारांनी MS-CIT कोर्स केलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे.

MS-CIT(जॉब रेडीनेस) हा पर्याय निवडण्याचे पुढील उद्देश असतील;

पहिली नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी किंवा पुढील अधिक चांगला रोजगार मिळवण्यासाठी, IT कौशल्यांवर आधारित जोड-व्यवसाय करण्यासाठी, नोकरीत प्रगती, पगारवाढ अथवा बढतीसाठी, नोकरी, घरकाम, व्यवसाय व इतर कामे सांभाळून, स्पर्धा परीक्षांची तयारी करत, महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत, डिजिटल ग्लोबल फ्रीलान्सिंगच्या सहाय्याने अगदी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पैसे कमविण्याची पध्दत या पर्यायामध्ये शिकवले जाणार आहे.

MS-CIT(आयटी अवेअरनेस) हा पर्याय निवडण्याचे पुढील उद्देश असतील;

डिजिटल युगात IT कौशल्य शिकून आत्मविश्वासाने पुढे जाऊ इच्छिणारे सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, शासकीय, निमशायकीय कर्मचारी व अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, गहिणी, समाजसेवक, राजकीय पुढारी इ. या शिवाय कुतूहलापोटी, मनोरंजनासाठी, आत्मसन्मानासाठी, अधिक ज्ञानासाठी, विशिष्ठ उपयोगासाठी, स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी व संगणक शिकू इच्छिणार्‍या सर्वांसाठी आयटी अवेअरनेस हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा... सीआरपीएफ जवानांनी एकमेकांवरच झाडल्या गोळ्या; दोघांचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती

रोजगाराच्या सर्वोत्तम संधींसाठी MS-CIT सोबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून इंडस्ट्रीला पूरक, अधिक सक्षम करण्यासाठी संगणक ज्ञान देणारे विविध कोर्सेस देखिल चालवले जातात. यांना क्लिक् (CLIC) कोर्सेस असे म्हणले जाते. या प्रकारचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची (YCMOU) मार्कशीट दिली जाते. याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे आवाहनही MKCL च्या वतीने करण्यात आले. यावेळी कोकण विभागीय समन्वयक जयंत भगत, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली, रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते आदी उपस्थित होते.

Intro:MS-CIT आता 2 प्रकारात
MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची गणपतीपुळेच्या पत्रकार परिषदेत माहिती

रत्नागिरी, प्रतिनिधी

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांच्या करीअर विषयी अपेक्षांमध्ये बदल झाले आहेत. MS-CIT कोर्सची संरचना आता केवळ शासकीय नोकरीसाठी उपयुक्त कोर्स किंवा आयटी अवेअरनेस अशी राहिली नाही. त्यामध्ये त्वरित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे, जॉबसाठी तयार करणारे बदल करण्यात आले आहेत. यामुळेच MS-CIT चे नवीन स्वरूप महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने सादर केले आहे. MS-CIT कोर्स आता जॉब रेडीनेस व आयटी अवेअरनेस अशा दोन पर्यायात उपलब्ध आहे.

गणपतीपुळे येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत याबद्दल महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांनी माहिती देताना सांगितले की, गेल्या दोन दशकांत तब्बल सव्वा कोटीहून अधिक जाणकारांनी MS-CIT कोर्स केलेला आहे. आयटी क्षेत्रातील पायाभूत ज्ञान देणारा सर्वोत्तम कोर्स म्हणून या कोर्सची ओळख आहे. MS-CIT(जॉब रेडीनेस): हा पर्याय निवडण्याचे पुढील उद्येश असतील- पहिली नोकरी किंवा स्वयंरोजगार मिळवण्यासाठी. पुढील अधिक चांगला रोजगार मिळवण्यासाठी, IT कौशल्यांवर आधारित जोड-व्यवसाय करण्यासाठी, नोकरीत प्रगती, पगारवाढ अथवा बढतीसाठी, नोकरी, घरकाम, व्यवसाय व इतर कामे सांभाळून, स्पर्धा परीक्षांची तयारी करत, महाविद्यालयीन शिक्षण घेत घेत, डिजिटल ग्लोबल फ्रीलान्सिंगच्या सहाय्याने अगदी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन पैसे कमविण्याची पध्दत या पर्यायामध्ये शिकवले जाणार आहे. MS-CIT(आयटी अवेअरनेस): डिजिटल युगात IT कौशल्य शिकून आत्मविश्वासाने पुढे जाऊ इच्छिणारे सर्व शालेय विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, शासकीय, निमशायकीय कर्मचारी व अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, गहिणी, समाजसेवक, राजकीय पुढारी इ. या शिवाय कुतूहलापोटी, मनोरंजनासाठी, आत्मसन्मानासाठी, अधिक ज्ञानासाठी, विशिष्ठ उपयोगासाठी, स्वतःची डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी व संगणक शिकू इच्छिणार्‍या सर्वांसाठी आयटी अवेअरनेस हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. रोजगाराच्या सर्वोत्तम संधींसाठी MS-CITसोबत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडून इंडस्ट्रीला पूरक, अधिक सक्षम करण्यासाठी संगणक ज्ञान देणारे विविध कोर्सेस देखिल चालवले जातात. यांना क्लिक् (CLIC) कोर्सेस असे म्हणले जाते. या प्रकारचे प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या प्रमाणपत्रा व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापिठाची (YCMOU) मार्कशीट दिली जाते. याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत प्रशिक्षण केंद्राला भेट देण्याचे आवाहनही MKCL च्यावतीने त्यांनी केले. यावेळी कोकण विभागीय समन्वयक जयंत भगत,सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक प्रणय तेली, रत्नागिरी जिल्हा समन्वयक संतोष कोलते आदी उपस्थित होते.

Byte -- विवेक सावंत, व्यवस्थापकीय संचालक MKCL

Body:MS-CIT आता 2 प्रकारात
MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची गणपतीपुळेच्या पत्रकार परिषदेत माहितीConclusion:MS-CIT आता 2 प्रकारात
MKCL चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची गणपतीपुळेच्या पत्रकार परिषदेत माहिती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.