ETV Bharat / state

लॉकडाऊन प्रेम- ६०० किमीची पायपीट, तिला परतही आणले, पण.. कोकणातील 'काहे दिया परदेस'

लॉकडाऊनच्या काळात प्रेयसीच्या ओढीने मुंबईतील तरुण पोलिसांची नजर चुकवत चक्क पायी प्रवास करत, मिळेत ते वाहन पकडत सिंधुदुर्गात पोहोचल्याचे समोर आले आहे. मात्र, तरुणीला घेऊन परत जाताना रत्नागिरी पोलिसांनी या दोघांनाही पकडून क्वारंटाईन केले आहे.

LockDown Lovestory
लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी
author img

By

Published : May 6, 2020, 2:21 PM IST

Updated : May 6, 2020, 3:40 PM IST

रत्नागिरी - आयुष्यभर एकमेकांची साथ देणारे, रुढी, प्रथा, चालीरीतीविरोधात संघर्ष करून एकत्र आलेले प्रेमीयुगुल आपण चित्रपटांतून नेहमीच बघतो. मात्र, तसाच अनुभव मुंबईतील प्रेमीयुगलांबाबत आला आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रेयसीच्या ओढीने मुंबईतील तरुण पोलिसांची नजर चुकवत चक्क पायी प्रवास करत, मिळेल ते वाहन पकडत सिंधुदुर्गात पोहोचल्याचे समोर आले आहे. मात्र, तरुणीला घेऊन परत जाताना रत्नागिरी पोलिसांनी या दोघांनाही पकडून क्वारंटाईन केले आहे.

लॉकडाऊनवाली लव्हस्टोरी
  • अशी आहे लव्ह-स्टोरी -

मुळचा उत्तर प्रदेशमधील असलेला प्रियकर मुंबईत एका ठिकाणी कामाला आहे. या ठिकाणी त्याचे सिंधुदुर्गमधील एका तरूणीबरोबर प्रेमसंबंध जुळले. ते मुंबईमध्ये एकत्र राहत होते. उत्तर प्रदेशातील तरुण आणि ही तरुणी लवकरच लग्नही करणार होते. त्यावेळी काही दिवसांपुर्वी तरुणी आपल्या वडिलांची तब्येत ठीक नसल्यामुळे गावी परतली अन् नेमके त्याचवेळी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या प्रेमी युगलामध्ये विरह निर्माण झाला.

  • विरह सहन न झाल्याने गाठले थेट प्रेयसीचे गाव -

प्रेयसी गावी अडकल्यामुळे मुंबईत प्रियकर चलबिचल झाला. त्यामुळे त्याने काहीही करुन प्रेयसीचे गाव गाठण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तो प्रेयसीला मुंबईला परत आणण्यासाठी चक्क पायीच गावी निघाला. पोलिसांची नजर चुकवत जवळपास 500 ते 600 किमी अंतर त्याने चालत, मिळेल ते वाहन पकडत पार केले अन् अखेर तो प्रेयसीला भेटला.

  • एवढं करुनही पदरी पुन्हा निराशाच -

प्रेमी युगलाची भेट झाल्यानंतर दोघांनीही पुन्हा मुंबईला जायचा निर्णय घेतला. त्यानंतर ते त्या दिवशी एका गावातील शाळेत थांबले. त्यांनी एक रात्र शाळेतच काढली. दुसऱ्या दिवशी ते मुंबईला निघाले. सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा पार करून ते रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. मात्र, लांजामध्ये शिवभोजन केंद्रामध्ये जेवण करत असताना पोलिसांना त्यांचा संशय आल्याने त्यांची चौकशी केली असता प्रकरण समोर आले.

दरम्यान, या दोघांना खारेपाटण बॉर्डरवरून परत पाठविण्यात आले असून दोघांनाही लांजा येथे क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या दोघांनी ज्या गावात रात्रभर वास्तव्य केले तेथील 30 पेक्षा जास्त जणांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. मात्र, प्रेमासाठी वाट्टेल ते करणाऱ्या या प्रियकराच्या नशिबी पुन्हा विरह आल्याने सध्या या दोघांची लव्ह स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे.

Last Updated : May 6, 2020, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.