ETV Bharat / state

रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्र दिन साजरा, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण - रत्नागिरी महाराष्ट्र दिन

दरवर्षी अगदी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मात्र, यंदा देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यात एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे निर्देश जारी केले होते.

ratnagiri latest news  ratnagiri maharashtra day  रत्नागिरी महाराष्ट्र दिन  महाराष्ट्र दिन न्युज
रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्र दिन साजरा, जिल्हाधकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
author img

By

Published : May 1, 2020, 10:02 AM IST

Updated : May 1, 2020, 11:14 AM IST

रत्नागिरी - १ मे महाराष्ट्र राज्य स्थापन दिवस. मात्र, सध्या महाराष्ट्रावर आणि देशावर सुद्धा कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन सोहळा रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य व एकमेव शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला.

रत्नागिरीत सोशल डिस्टन्सिंग पाळत महाराष्ट्र दिन साजरा, जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

दरवर्षी अगदी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. मात्र, यंदा देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्ह्यात एकाच ठिकाणी ध्वजारोहण करण्याचे निर्देश जारी केलेले होते. त्यामुळे रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात हा एकच ध्वजारोहण सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या हस्ते सोशल डिस्टन्सिंग ठेवून ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या या ध्वजारोहण सोहळयास जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड तसेच उपजिल्हाधिकारी सुशांत बनसोडे, विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव आदींची उपस्थिती होती.

Last Updated : May 1, 2020, 11:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.