पेण - राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे ( National Science Day ) औचित्य साधून पेण बोरगाव येथील कोनायसन्स स्कुल ( Convenience School Pen ) येथे जेष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने यांच्या हस्ते सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले. 28 फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशाभरात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.
28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिन साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधून पेण येथील कोनायसन्स स्कुल येथे सोबती संस्थेचे संस्थापक, शिक्षण महर्षी बापूसाहेब नेने यांच्या हस्ते सायन्स लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जेष्ठ समाजसेवक बापूसाहेब नेने, बापूसाहेब आठवले, अॅड. मंगेश नेने, माजी सरपंच नाना महाडिक, बोरगाव सरपंच सुधीर पाटील, माजी उपनगराध्यक्ष दीपक गुरव, संस्थेचे अध्यक्ष डॉ.मनीष वनगे, डॉ.सोनाली वनगे, माजी माजी नगरसेवक जितू ठाकूर, ज्योती गुरव, जनार्दन पाटील, प्रकाश गुरव, प्राचार्या सुप्रिया विखनकर, जमीला शिरपूवाला आदींसह पालक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - Heroin Seized Mumbai : मुंबई विमानतळावर 56 कोटींचे ड्रग्ज जप्त; सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई