ETV Bharat / state

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार.. काही नद्यांनी ओलांडली इशारा पातळी, चिपळूणमध्ये पाणी तुंबलं - मुसळधार पाऊस रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी मुसळधार पाऊस ( Heavy rain in Ratnagiri district ) पडला. चिपळून शहरात ( Chiplun rainfall news ) अनेक ठिकाणी पाणी तुंबले. राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा ( Rivers crossed warning level in Ratnagiri ) पातळी ओलांडली आहे. त्यामुळे, नद्याना पूर येऊन पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण - मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील ( Ratnagiri rainfall ) व्यापार्‍यांची एकच धांदल उडाली. तेथील व्यापार्‍यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बोटींचा वापर केला.

Heavy rain in Ratnagiri district
मुसळधार पाऊस रत्नागिरी
author img

By

Published : Jul 5, 2022, 7:46 AM IST

रत्नागिरी - जिल्ह्याला सोमवारी मुसळधार पावसाने ( Heavy rain in Ratnagiri district ) झोडपून काढले. त्यामुळे, काही ठिकाणी पाणी तुंबले, तर काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने पुराचे पाणी शहरात घुसले. त्यामुळे, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. चिपळूण शहर ( Chiplun rainfall news ) आणि ग्रामीण भागात सोमवारी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. धो-धो असा पाऊस पडत होता. त्यामुळे, चिपळूण शहरात ( Rivers crossed warning level in Ratnagiri ) अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे कॉलेज, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबल्याने वाहतूक पूर्णतः कोळमडली होती. एक ते दीड फूट पाण्यातून ( Ratnagiri rainfall ) वाहने काढली जात होती. सलग मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकूणच पहिल्याच पावसात चिपळूणमधील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

पावसानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांचे दृश्य

हेही वाचा - Ratnagari Refinery project : रिफायनरी प्रकल्पासाठी आमची जमीन घ्या ; शेतकऱ्यांकडून एकूण 3 हजार एकरची संमतीपत्रे

तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं - चिपळूण शहरात पुराचं पाणी आलं नसलं तरी शहरात अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. अनंत आईस फॅक्ट्री, तसेच जिप्सी कॉर्नर जुना भैरी रस्ता, लोकमान्य टिळक वाचनालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहन चालक व नागरिकांना, तसेच शालेय विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. अर्धवट झालेली नाले सफाई, तसेच महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे पहिल्याच पावसात शहराची ही अवस्था झाल्याचे नागरिक सांगत होते.

अर्जुना आणि कोदवली नद्यांनी ओलांडली इशारा पातळी - राजापूर तालुक्यातील अर्जुना आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे, नद्याना पूर येऊन पुराच्या पाण्याने राजापूर शहराला वेढा घातला आहे. पुराच्या पाण्याने जवाहर चौकामध्ये धडक देण्याची यावर्षीची पहिली घटना आहे. तासागणिक पुराचे पाणी वाढत चालले आहे. त्यामुळे, व्यापारी वर्ग धस्तावला आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शीळ गोठणे दोनीवडे चिखलगाव रस्ता पाण्याखाली गेला आहे. नदीच्या काठावरील शीळ, उन्हाळे, गोठणे दोनीवडे, चिखलगाव, आगले आदी गावातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. तर, मूर कोळंब काजीरडा रस्त्यावरील मूर पाटीलवाडी येथे मोरीवरून पाणी जात असल्याने या मार्गांवरील वाहतूक ठप्प झलेली आहे. जामदा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने संभाव्य पुरस्थीतीच्या अनुषंगाने मूर सुतार वाडीतील काठावरील काही घरे आणि दुकानांमधील साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. तर, लोकांना अलर्ट राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

खेड शहरातील मच्छी मार्केट परिसरात जगबुडीच्या पुराचे पाणी - खेड तालुक्याला काल पावसाने चांगलेच झोडपून काढले. मुसळधार पावसाने जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खेड नगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी व नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नद्यांच्या लगत असलेली शेती व वीट भट्ट्या पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास ग्रामीण भागात जाणारे मार्ग बंद होण्याची दाट शक्यता आहे.

व्यापार्‍यांना बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर - पावसाचा जोर वाढत असून, ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झालेला आहे. संततधार पावसामुळे खेड मटण - मच्छी मार्केट परिसरात जगबुडी नदीच्या पुराचे पाणी घुसले. त्यामुळे मच्छीमार्केट परिसरातील व्यापार्‍यांची एकच धांदल उडाली. तेथील व्यापार्‍यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बोटींचा वापर केला. काल सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास येथील प्रांताधिकारी राजेश्री मोरे व तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांनी देखील खेड शहर आणि परिसरातील आपद्ग्रस्त भागाची पहाणी केली. त्यानुसार त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सद्या जगबुडी नदी धोक्याच्या पातळीने वाहत आहे. नदी किनार्‍यावर मासे मारी करण्यासाठी कोणीही जावू नये, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तर, पावसामुळे महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे, महामार्गावरील वाहतूक देखील धिम्या गतीने सुरू आहे.

अंजणारी बस स्टॉप जवळील लोक वस्तीमध्ये घुसले पाणी - जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पाऊस बरसला. अनेक ठिकाणी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील अंजणारी बस स्टॉप जवळील लोकवस्तीमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तीव्र उतरावरील रस्त्याला गटार नसल्याने हे पाणी रहिवासी वस्तीमध्ये शिरले आहे. लांजा आपात्कालीन कक्षाला सूचना मिळताच सार्वजनिक बांधकाम अधिकारी, तलाठी घटनास्थळी पोहचले. रस्त्यालगत असलेली 3 दुकाने पाण्याखाली गेली होती, यात एक किराणा दुकान, दुसरे टेलरचे दुकान आणि सलून अशी तीन दुकाने पाण्याखाली गेली असून दुकानांमधील मधील सामानाचे नुकसान देखील झालेले आहे.

हेही वाचा - Shivsena Active In Ratnagiri : रत्नागिरीत शिवसेना झाली सक्रीय, 10 जुलैला मेळावा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.