रत्नागिरी - जिल्ह्याच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. शुक्रवारी (दि. 8 मे) पुन्हा एकदा 4 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये चिपळूण, मंडणगड आणि दापोली तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. तर जिल्हा रुग्णालयातील एका नर्सिंगच्या विद्यार्थिनीला कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंतचा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडा 21वर पोहोचला आहे. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरीत 15 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील काही दिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या पाच दिवसांत 11 रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज पुन्हा चार रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयातील एका नर्सिंग विद्यार्थिनींचा समावेश आहे. तर खेड 1, मंडणगड 1 आणि चिपळूणमध्ये 1 रुग्ण आढळला आहे. यातील 3 जण मुंबई येथून आलेले आहेत.
दरम्यान, दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, शून्यावर आलेली कोरोना बाधितांची संख्या पुन्हा 15 वर आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.
हेही वाचा - रत्नागिरीतून 6 विशेष बस रवाना.. प्रत्येक बसमध्ये 22 प्रवाशांचे नियोजन