रत्नागिरी - मुंबईवरुन कोकण रेल्वेने येणार्या चाकरमान्यांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने पाच जणांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर हे पथक असणार आहे. यापूर्वी या ठिकाणी एकच कर्मचारी ठेवण्यात आला होता. त्याची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
रेल्वे स्थानकातच होणार कोरोना चाचणी
कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी रेल्वे स्थानकावर करण्यात येणार आहे. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांनी रेल्वेस्थानकाला भेट देऊन कोकण रेल्वेने रत्नागिरी येथे येणार्या सर्व प्रवाशांच्या कोविड तपासणीच्या नियोजनाबाबत माहिती घेतली आहे. कोकण रेल्वेने रत्नागिरी येथे येणार्या व उतरणार्या प्रवाशांच्या संख्येबाबतही अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. दरम्यान सर्व प्रवाशांची कोविड तपासणी रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्येच करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड यांनी दिल्या आहेत. रेल्वेने येणार्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार तपासणी पथकांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी 3 कर्मचार्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. हे पथक रत्नागिरी रेल्वे स्थानकात 24 तास कार्यरत राहणार असल्याचेही जाखड यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-अखेर देवाचं दार उघडलं! मुंबईत मंदिरात बनवले कोविड सेंटर