ETV Bharat / state

भारत बंद.. जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प - Ratnagiri bharat bandh News

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आजच्या भारत बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी झाल्याने, बाजार समितीतील कामकाज पूर्णतः ठप्प आहे. बाजार समितीच्या मुख्य गेटलाच कुलूप लावण्यात आले आहे. तसेच बंद बाबत जाहीर सूचना देखील लावण्यात आली आहे. त्यामुळे दरोरोज होणारे शेकडो टनाचे लिलाव पूर्णतः बंद ठेवण्यात आलेत.

रत्नागिरी बाजार समिती बंद न्यूज
रत्नागिरी बाजार समिती बंद न्यूज
author img

By

Published : Dec 8, 2020, 12:05 PM IST

Updated : Dec 8, 2020, 12:52 PM IST

रत्नागिरी - कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीही सहभागी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णतः ठप्प आहेत. अनेक पक्षांकडून जिल्हा, शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला तुरळक प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी काही वेळ व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. मात्र, सकाळी साडेदहानंतर आणि दुपारी बाराच्या जवळपास बहुतेक दुकाने उघडण्यात आली.

जिल्हा, शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन; मात्र, प्रतिसाद तुरळक
बाजार समिती बंद
केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आजच्या भारत बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी झाल्याने, बाजार समितीतील कामकाज पूर्णतः ठप्प आहे. बाजार समितीच्या मुख्य गेटलाच कुलूप लावण्यात आले आहे. तसेच बंद बाबत जाहीर सूचना देखील लावण्यात आली आहे. त्यामुळे दरोरोज होणारे शेकडो टनाचे लिलाव पूर्णतः बंद ठेवण्यात आलेत. पहाटे पासून बाजार समितीमध्ये कुठलेच लिलाव झाले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला घेवून येणाऱ्या गाड्या आज बाजार समितीत आल्या नाहीत.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा - राजू शेट्टींकडून कृषी विधेयकाची होळी; म्हणाले, शेतकरी एकटा नाहीये हे बंदमधून समजलं

काय म्हटले आहे सूचनेत

बाजार समिती बंद असल्याची सूचना या ठिकाणी लावण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'सर्व शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल व खरेदीदारांना या जाहीर सूचनेद्वारे सूचित करणेत येते की, केंद्र शासनाने 5 जून 2020 रोजी 3 शासन निर्णय पारित केलेले आहेत. त्यास विरोध म्हणून देशातील विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार दिनांक 08-12-2020 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. संबंधित बंदला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे व मंडी समिती कर्मचारी संघ, भारत यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी ही महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची सभासद असून रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सुध्दा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे सभासद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मंगळवार दिनांक 08-12-2020 रोजी भारत देश बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी सहभागी होत असल्यामुळे बाजार समिती आवारातील भाजीपाला लिलाव व कार्यालयीन कामकाज बंद राहील.'

हेही वाचा - शेतकरी आंदोलन : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बंद; एपीएमसी परिसरात शुकशुकाट

रत्नागिरी - कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीही सहभागी झाली आहे. त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार पूर्णतः ठप्प आहेत. अनेक पक्षांकडून जिल्हा, शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, या आवाहनाला तुरळक प्रतिसाद मिळाला आहे. सकाळी काही वेळ व्यापाऱ्यांची दुकाने बंद होती. मात्र, सकाळी साडेदहानंतर आणि दुपारी बाराच्या जवळपास बहुतेक दुकाने उघडण्यात आली.

जिल्हा, शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन; मात्र, प्रतिसाद तुरळक
बाजार समिती बंदकेंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आजच्या भारत बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती सहभागी झाल्याने, बाजार समितीतील कामकाज पूर्णतः ठप्प आहे. बाजार समितीच्या मुख्य गेटलाच कुलूप लावण्यात आले आहे. तसेच बंद बाबत जाहीर सूचना देखील लावण्यात आली आहे. त्यामुळे दरोरोज होणारे शेकडो टनाचे लिलाव पूर्णतः बंद ठेवण्यात आलेत. पहाटे पासून बाजार समितीमध्ये कुठलेच लिलाव झाले नाहीत. पश्चिम महाराष्ट्रातून भाजीपाला घेवून येणाऱ्या गाड्या आज बाजार समितीत आल्या नाहीत.
रत्नागिरी कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा - राजू शेट्टींकडून कृषी विधेयकाची होळी; म्हणाले, शेतकरी एकटा नाहीये हे बंदमधून समजलं

काय म्हटले आहे सूचनेत

बाजार समिती बंद असल्याची सूचना या ठिकाणी लावण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, 'सर्व शेतकरी, व्यापारी, अडते, हमाल व खरेदीदारांना या जाहीर सूचनेद्वारे सूचित करणेत येते की, केंद्र शासनाने 5 जून 2020 रोजी 3 शासन निर्णय पारित केलेले आहेत. त्यास विरोध म्हणून देशातील विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार दिनांक 08-12-2020 रोजी भारत बंदची हाक दिली आहे. संबंधित बंदला महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे व मंडी समिती कर्मचारी संघ, भारत यांनी सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी ही महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाची सभासद असून रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी सुध्दा महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे सभासद आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ, पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे मंगळवार दिनांक 08-12-2020 रोजी भारत देश बंदमध्ये रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती, रत्नागिरी सहभागी होत असल्यामुळे बाजार समिती आवारातील भाजीपाला लिलाव व कार्यालयीन कामकाज बंद राहील.'

हेही वाचा - शेतकरी आंदोलन : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही बाजार बंद; एपीएमसी परिसरात शुकशुकाट

Last Updated : Dec 8, 2020, 12:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.