ETV Bharat / state

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीला फटका.. 5 जण जखमी, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर - निसर्ग चक्रीवादळ रत्नागिरी बातमी

मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तीन जणं जखमी झाले. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला आहे.

cyclone-nisarga-hits-ratnagiri-5-people-injured
निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीत फटका..
author img

By

Published : Jun 4, 2020, 2:31 PM IST

रत्नागिरी- निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला. रत्नागिरी तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांनी झाडे मुळापासून उन्मळून घरांवर कोसळली. झाडे कोसळल्याने रत्नागिरी तालुक्यात पाच जण जखमी झाले. तर काही घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दिवसभर निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसत होता. रत्नागिरी तालुक्यातील शहर तसेच अनेक गावेही समुद्र किनाऱ्यानजिक आहेत. त्यामुळे वेगवान वार्‍यांनी कुणाच्या घराचे, शेडचे तर कुणाच्या गोठ्यांचे छत उडाले.

निसर्ग चक्रीवादळाचा रत्नागिरीत फटका..

मिरजोळे येथील एका घरावर झाड पडून तिन जण जखमी झाले. उंडी येथील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तसेच पूर्णगड येथील एका घरावर झाड कोसळल्यामुळे एक जण जखमी झाला आहे. मजगाव येथील पंजाब नॅशनल बँकेजवळील एका घरावर झाड पडले, कुवारबाव येथील सुनिता गावकरांच्या घराचे पत्रे उडाले, फणसोपातील सुनिल साळवींच्या घराचे, भोकेत एका घराचे, जाकिमिर्‍यातील प्रभाकर जाधव यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले.

नांदीवडेत विजेच्या खांबावर झाडपडून वाहिन्या रस्त्यावर पडल्या होत्या. नाणीज येथील रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर झाड पडल्यामुळे वाहतूक काही काळ बंद होती. मात्र, ग्रामस्थांच्या मदतीने ते झाड काढून टाकण्यात आले. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. बसणी येथील गणपत लोगडे यांच्या घरावर सुरमाडाचे झाड कोसळून सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी शहरालाही वादळाचा फटका बसला. शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयाच्या छतावरील पत्रे वार्‍यामुळे उडाले. कुर्धेतील विकास शिंदेच्या घरावर झाड पडून घराचे नुकसान झाले असून दोघांना किरकोळ दुखापत झाली. सुरेश शिंदेंच्या रिक्षावर झाड कोसळले. सध्या ठिकठिकाणी पंचनामे सुरू असून, परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

हेही वाचा- दिल्लीला भूकंपाचे धक्के; दीड महिन्यात तब्बल ११ वेळा हादरली दिल्ली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.