ETV Bharat / state

Mother's Day : 'ती' दररोज खंत व्यक्त करते, तू मला किती दिवस अशी लांब ठेवणार! आरोग्यमातेची कुटुंब कहाणी

author img

By

Published : May 10, 2020, 6:31 PM IST

Updated : May 11, 2020, 9:58 AM IST

देशात कोरोनाचे संकट आणखीनच गडद झाले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रशासनावरही याचा ताण पडतो आहे. यामध्ये सगळ्यात जास्त कसरत करावी लागतेय, ती आरोग्य आणि पोलीस विभागातील महिला कर्मचाऱ्यांना. एकीकडे आपले कर्तव्य बजावणे आणि दुसरीकडे कुटुंब संभाळणे, या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. घरी मुलांना वेळ देता येत नाही याची त्यांना खंत आहे. तरिही, देशसेवा प्रथम असे म्हणत या महिला आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत.

Dr Sanghamitra Phule Ratnagiri news
रत्नागिरी वैद्यकिय अधिकारी डॉ. संघमित्रा फुले

रत्नागिरी - जिल्ह्यातील डॉ. संघमित्रा महेंद्र फुले (गावडे) या कान, नाक, घसा यांच्या तज्ज्ञ आहेत. डॉ. संघमित्रा फुले या गेली 20 वर्षांपासून शासकीय सेवेत आहेत. सध्या त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहेत. तर त्यांचे पती महेंद्र गावडे हे देखील डॉक्टर असून रत्नागिरीचे तालुका आरोग्य अधिकारी आहेत. या दोघांनाही या कठीण काळात आपले कर्तव्य बजावण्यासाठी दररोज घराबाहेर जावे लागत आहे. मात्र, यामुळे त्यांची सहा वर्षांची मुलगी विदिशा दिवसभर आई आणि वडिलांच्या लाडाला मुकत आहे.

सहा वर्षांच्या मुलीला घरीच ठेऊन डॉ. संघमित्रा फुले या दररोज करतात कोरोनाशी दोन हात.. मुलीची अबाळ होत असल्याची खंत...

आपल्या जबाबदारीच्या कामामुळे डॉ. संघमित्रा फुले यांना आपली मुलगी विदिशा हीला जास्त वेळ देता येत नाही. दोघेही नवरा बायको घराबाहेर असल्यामुळे विदिशाला दिवसभर केअर टेकरकडे ठेवावे लागत आहे. त्यात सध्या कोरोनाते संकट असल्याने सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खूपच काळजी घ्यावी लागत आहे. 'आईबाबा आपल्याला वेळ देत नाहीत' अशी विदिशाची तक्रार आहे.

हेही वाचा... Mother's Day: महिलांना कुठला आलाय लॉकडाऊन ? असा प्रश्न मनात असेल तर ही बातमी नक्की पाहा

दिवसभर जोखमीच्या कामावर असतात डॉ. संघमित्रा...

डॉ. संघमित्रा फुले या सध्याच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात अतिशय जोखमीचे काम म्हणजेच रुग्णांचे स्व‌ॅब (घशातील स्त्रावाचे नमुने) घेण्याचे काम करत आहेत. खूप काळजीपूर्वक संशयित रुग्णांचे स्व‌ॅब घेण्याचे काम त्यांना करावे लागत आहे. याशिवाय वार्डमध्ये जाणे, पेशंट तपासणे हेही काम त्यांना करावे लागत आहे. या सर्व परिस्थितीत संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्या पहिल्यांदा स्नान करून संपूर्ण घर निर्जंतुकीकरण करतात. त्यानंतरच केअर टेकरकडून आपल्या मुलीला घेऊन येतात.

मला विदिशाला जवळ घेऊन झोपताही येत नाही...

'आम्ही आईवडील दोघेही दिवसभर बाहेर असल्याने विदिशा आम्हाला भेटण्यासाठी खूप व्याकूळ असते. आम्ही तिला वेळ देत नाही, ही तिची नेहमी तक्रार असते. रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्याने विदिशाला जवळ घेऊन झोपता येत नाही. त्यामुळे हा खरंतर तिच्यावर एक प्रकारचा आघात आहे' असे डॉ. संघमित्रा गावजे (फुले) यांनी सांगितले. मात्र, हळूहळू मुलगी विदीशा सर्वकाही समजून घेत आहे. कोरोना काय आहे, हे तिलाही कळायला लागलंय असे डॉ. संघमित्रा यांनी सांगितले. तरिही, कोरोना कधी जाणार, हा विदिशाचा सततचा प्रश्न असल्याचेही फुले यांनी म्हटले आहे.

कर्तव्य बजावत असताना एक आई मुलीला वेळ देत नाही याची डॉ. संघमित्रा यांना खंत

सध्याच्या परिस्थितीत घरात काम करण्यासाठी कोणाला घरी ठेवता येत नाही. त्यामुळे घरची सर्व कामे केल्यानंतर दिवसभर रुग्णसेवा करणे, यासाठी डॉ. संघमित्रा यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात सध्याच्या काळात त्यांना सुट्टीही घेता येत नाही. आपले कर्तव्य बजावत असताना एक आई म्हणून मुलीला मात्र वेळ देता येत नाही, याची खंत डॉ. संघमित्रा यांना वाटते. असे असले तरिही दुसरीकडे मात्र, कोरोनाच्या लढाईत अग्रेसर असणाऱ्या आरोग्य विभागात आपण काम करत आहोत आणि देशापुढील या संकटाला थोपवण्यासाठी आपणही खारीचा वाटा उचलत असल्याचे समाधान डॉ. संघमित्रा फउले (गावडे) यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

हेही वाचा... Mother's Day : मम्मा लवकर ये.. मला आठवण येतेय! 52 दिवसांपासून मायलेकांची ताटातूट

Last Updated : May 11, 2020, 9:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.