ETV Bharat / state

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी सर्वतोपरी मदत करणार; जलविद्युत केंद्राची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

cm
मुख्यमंत्र्यांकडून कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी
author img

By

Published : Dec 10, 2020, 4:19 PM IST

Updated : Dec 10, 2020, 4:55 PM IST

रत्नागिरी - आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणी दरम्यान व्यक्त केला.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री (गृह) शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोंकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प

भास्कर जाधव - शिवसेना आमदार

कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी आडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळून या टप्प्यातून 1920 MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगराच्या पोटात ३०० मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातून लेक टॅपिंग पद्धतीने १००० MW (मेगावॉट) वीज निर्मिती केली जाते.

पाहणीवेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण

cm
मुख्यमंत्र्यांकडून कोयना जलविद्युत प्रकल्पाची पाहणी

जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणी वेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबी अभियंत्यांकडून माहिती करून घेतल्या. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

कोयना जलविद्युत प्रकल्प

१६ जानेवारी १९५४ ला मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते कोयना प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मार्च १९५८ ला धरणाच्या कामास प्रारंभ झाला. १९५८-५९ मध्ये प्रकल्पाचा टप्पा एक आणि दोनची कामे पूर्ण झाली आणि १६ मे १९६२ ला कोयना प्रकल्पातून प्रत्यक्ष वीजनिर्मिती सुरू झाली. १९६४ पर्यंत धरणाचे बांधकाम पूर्ण झाले १९६१ च्या पावसाळ्यात पहिल्यांदा वरून धरणात पाणी साठले. पहिल्या दोन टप्प्यांनंतर कोळकेवाडीचा तिसरा टप्पा पार पडला. तेथेही भूमिगत वीजगृह बांधून वीजनिर्मिती सुरू करण्यात आली . नंतर अधिक वीजनिर्मितीसाठी चौथ्या टप्प्याचे कामही सुरू झाले.

चौथ्या टप्प्यातून ३१ मार्च १९९९ ला वीजनिर्मिती सुरू झाली. १३ मार्च १९९९ ला तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे तसेच २५ एप्रिल २०१२ ला धरणातील दुसऱ्या लेक टॅपिंगवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोयना प्रकल्पाला भेट दिली होती. मात्र, चौथ्या टप्प्याला भेट देणारे उद्धव ठाकरे हे पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

Last Updated : Dec 10, 2020, 4:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.