ETV Bharat / state

सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारबाबत पुनर्विचार करू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा कोकणात पुन्हा एकदा तापू लागला आहे. याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारले असता लोकांना विकास हवा असेल, नाणार प्रकल्प पुन्हा हवा असेल तर आम्ही तो आणण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड
author img

By

Published : Oct 10, 2019, 7:31 PM IST

रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सूचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प हा सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने आणला जाईल, असे ते म्हणाले. गुरुवारी शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सर्व पक्षाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणारबाबत पुनर्विचार करू, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा कोकणात पुन्हा एकदा तापू लागला आहे. याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारले असता लोकांना विकास हवा असेल, नाणार प्रकल्प पुन्हा हवा असेल तर आम्ही तो आणण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.

निवडणुकीनंतर लोकांच्या भावना समजून घेतल्या जातील, असे म्हणत भाजप नाणारबाबत किती आग्रही हे लाड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, तर कणकवलीत नितेश राणे हेच भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. ही जागा भाजपसाठी महायुतीने सोडली आहे. त्यामुळे महायुती म्हणून ही जागा भाजपची आहे. भाजपचे उमेदवार आहेत त्याठिकाणी शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने काम करतील, असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या भूमिकेवर मात्र बोलण्याचे लाड यांनी टाळले.

Intro:सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य

नितेश राणे हे महायुतीचेच उमेदवार - प्रसाद लाड

रत्नागिरी, प्रतिनिधी

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य केलं आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प हा सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने आणला जाईल असं विधान प्रसाद लाड यांनी केली. गुरुवारी रत्नागिरीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रत्नागिरीत आल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार बाबत पुनर्विचार करू असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नाणार रिफायनरीचा मुद्दा कोकणात पुन्हा एकदा तापू लागला आहे. याबाबत भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत विचारलं असता,
लोकांना विकास हवा असेल, नाणार प्रकल्प लोकांना पुन्हा हवा असेल तर आम्ही तो आणण्याचा प्रयत्न करू.
सर्व पक्षांच्या नेतृत्वाच्या सहमतीने हा प्रकल्प आम्ही आणण्याचा प्रयत्न करू असं, भाजप प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद यांनी म्हटलं आहे. निवडणुकीनंतर लोकांच्या भावना समजून घेतल्या जातील असं म्हणत भाजप नाणार बाबत किती आग्रही हे लाड यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे..
तर कणकवलीत नितेश राणे हेच भाजपाचे अधिकृत उमेदवार आहेत, हि जागा भाजपसाठी महायुतीने सोडली आहे. त्यामुळे महायुती म्हणुन हि जागा भाजपची आहे, जिथे भाजपाचे उमेदवार आहेत तीथे शिवसेनेचे पदाधिकारी जोमाने काम करतील असा विश्वास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या भूमिकेवर मात्र प्रसाद लाड यांनी बोलणं टाळलं..

Byte - प्रसाद लाड, भाजप प्रदेश उपाध्यक्षBody:सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी सुचक आणि लक्ष्यवेधी वक्तव्य Conclusion:सर्व पक्षाच्या नेतृत्वाच्या सहमतीने नाणार रिफायनरी प्रकल्प आणला जाईल - प्रसाद लाड

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांचं सूचक वक्तव्य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.