रत्नागिरी : भाजप नेते आशिष शेलार ( BJP leader Ashish Shelar ) हे रत्नागिरीच्या दौऱ्यावर ( Visit to Ratnagiri ) असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ( 2024 Lok Sabha elections ) भाजपने आता तयारी सुरू केली आहे. जिथे भाजपचा खासदार नाही, त्या ठिकाणी विशेष करून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे कमळच जिंकले पाहिजे याची तयारी आम्ही सुरू केली आहे. येत्या निवडणुकीत कमळच जिंकेल, असा विश्वास भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी आज रत्नागिरीत व्यक्त केला आहे. ( Belief that BJP will win in Coming Elections )
आशिष शेलार यांनी दाखवला आत्मविश्वास : आशिष शेलार शुक्रवारी जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी रत्नागिरीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेलार म्हणाले, जी शिवसेना बाळासाहेबांची आहे, त्यांच्याबरोबर आमची युती आहे. युतीतल्या पक्षाबरोबर दगाफटका करणे आमचा स्वभाव नाही. दुसरी कुठली शिवसेना असेल तर ती आता इतकीशी राहिलेली नाही.
आता भाजपच जिंकेल : जिंकणारा चेहरा एकच आहे तो म्हणजे कमळ आणि कमळ चिन्ह असलेला व्यक्ती जिंकेल या दिशेने आमचा कार्यक्रम सुरू आहे. यापुढे ही जागा भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्ह वाढवेल आणि कमळ चिन्ह जिंकेल. आतापर्यंत दुसऱ्यांना मदत खूप केली. आमच्या मदतीवर ते जिंकून आले आणि मग आम्हालाच दात दाखवायला लागले. त्यामुळे आता हा प्रकार आम्हाला मान्य नाही, असे शेलार यावेळी म्हणाले.
हेही वाचा : Goa Assembly Session: गोव्यात अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी कोळशावरुन पेटलं राजकारण