रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज 500 पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 626 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून तब्बल 21 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ -
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण जिल्ह्यात दररोज सापडू लागले आहेत. दरम्यान आज आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 626 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील 436 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 190 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 626 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 21 हजार 695 एवढी झाली आहे.
21 मृत्यूंची नोंद -
आज एकूण 20 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी मृत्यू झालेल्या एका मृत्यूची घोषणा आज करण्यात आली आहे. त्यामुळे आज एकूण 21 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 640 वर जाऊन पोहचली आहे.
हेही वाचा - दारूसाठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची राजापूरमध्ये मोठी कारवाई